अबब! पानटपरीला दररोज ५०० रुपये हप्ता; २५ हजार रुपये खंडणी उकळणाऱ्याला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 04:27 PM2020-12-09T16:27:51+5:302020-12-09T16:34:21+5:30

पान टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, पैसे दिले नाही तर तुझी टपरी बंद करेन..

Ohh! 500 daily installment by Pan shop; Rs 25,000 ransom recovred person arrested | अबब! पानटपरीला दररोज ५०० रुपये हप्ता; २५ हजार रुपये खंडणी उकळणाऱ्याला बेड्या 

अबब! पानटपरीला दररोज ५०० रुपये हप्ता; २५ हजार रुपये खंडणी उकळणाऱ्याला बेड्या 

Next

पुणे : पान टपरीचालकाकडे दररोज ५०० रुपये याप्रमाणे २५ हजार रुपयांची खंडणी उकळणार्यास कोंढवा पोलिसांनीअटक केली. गेल्या वर्षभरापासून तो या पानटपरीचालकाकडून खंडणी वसुल करीत होता.

इम्तियाज दाऊद मेमन (वय ४५, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.याप्रकरणी रमजान रज्जाक खान (वय २३, रा. बाबाजान मशिदजवळ, शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान खान यांची सत्यानंतद हॉस्पिटलसमोर पान टपरी आहे. गेल्या एक दोन वर्षांपासून ते पान टपरी चालवितात. २ - ३ महिन्यांपासून मेमन याने खान यांना धमकावून पान टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, पैसे दिले नाही तर तुझी टपरी बंद करेन अशी धमकी तो देत होता. या धमकीला घाबरून रमजान खान हा गेले २ महिने त्याला हप्ता देत होता. आतापर्यंत त्याने २५ हजार रुपये मेमन याला दिले. आता मात्र त्याला पैसे देणे शक्य नसल्याचे त्याने सांगितल्यावर मेमनने त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. शेवटी त्याने कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. इम्तियाज मेमन याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर अधिक तपास करीत आहे.

Web Title: Ohh! 500 daily installment by Pan shop; Rs 25,000 ransom recovred person arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.