साह्यकडा एडवेंचरकडून 'तैलबैल सुळका' सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:48+5:302021-02-23T04:15:48+5:30

प्रारंभी सह्याद्रीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लीड ...

'Oilbell Cone' from Adventure to Sahyakada Sir | साह्यकडा एडवेंचरकडून 'तैलबैल सुळका' सर

साह्यकडा एडवेंचरकडून 'तैलबैल सुळका' सर

Next

प्रारंभी सह्याद्रीचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लीड क्लाईंबर राहुल खोराटे आणी बिलेअर श्रीराम पवळे यांनी सर्व तयारीनिशी तैलबैल सुळका किल्ला मार्गाने आरोहणास सुरुवात केली. पहिल्या स्टेशनपर्यंत असेली ७० ते ८० अंशांतील कातळ चढाई झटपट चढून राहुलने पहिल्या स्टेशनचे रोप फिक्स केले. नव्या जुन्या सगळ्या गिर्यारोहकांचे वैयक्तिक सेफ्टी गिअर किरण पोतले व सागर मांडेकर यांनी तपासून घेतले.

तिसऱ्या स्टेशनच्या सुरुवातीला असलेला ९० अंशातील अवघड कातळकडा चढून राहुल आणी श्रीरामने समिट करत रोप फिक्स केले.

अवघड ठिकाणी गिर्यारोहकांचे फिक्सिंग बदलण्याची मोठी जबाबदारी निखिल पोखरकर, सचिन पाटील, किरण दौंडकर यांनी पार पाडली. तर गिर्यारोहकांना सुरक्षा दोर देण्याची जबाबदारी बाबाजी चौधरी आणी श्रीराम पवळे यांनी पार पाडली. हर - हर महादेव व शिवगर्जना करत गिर्यारोहकांनी तैलबैल किल्ला सर केला.

या मोहिमेत वैभव फापाळे, दत्ता पोतले, निखिल पोतले, पवनकुमार शिवले, प्रणव हरगुडे, मिलिंद चासकर, हर्षल शिंदे, प्रवीण महाडिक, गणेश डांगे, दीपक जाधव, उदय सावंत, अखिल जाधव, हनुमंत जाधव, मनोज सुर्वे, सौ. सुर्वे, अर्जुन सुर्वे, सई सुर्वे, सुरज गावडे, चंद्रकांत बंड, शैनक केळूसकर, सोहम केळूसकर, सौरभ मगदूम, सौरभ शिंदे यांचा सहभाग होता.

अवघड श्रेणीतील मोहिमेत ८ वर्षीय काव्यांजली पाटील या बाल हिरकणीने सहभाग घेतला. तसेच ५९ वर्षीय धनराज मोझे या चिरतरूण गिर्यारोहकांनी समिट नोंदवला.

२१ शेलपिंपळगाव तैलबैल

तैलबैल सुळका' आरोहण मोहीम यशस्वीरित्या सर करणारे गिर्यारोहक.

Web Title: 'Oilbell Cone' from Adventure to Sahyakada Sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.