तेलबिया लागवडीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:12+5:302021-07-07T04:13:12+5:30
बारामतीत ‘कृषी दिन-कृषी संजिवणी’ सप्ताहाचा समारोप बारामती : सध्या तेलबिया लागवडीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. या शेती उत्पादनावर आधारित ...
बारामतीत ‘कृषी दिन-कृषी
संजिवणी’ सप्ताहाचा समारोप
बारामती : सध्या तेलबिया लागवडीला मोठ्या प्रमाणात वाव आहे. या शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग देखील उभारले जाऊ लागले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी एरंड, सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन आदी तेलबिया पिकांची लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले.
जळगाव सुपे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बारामती व पंचायत समिती बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून 'कृषि दिन-कृषि संजीवनी' सप्ताहाचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. बारामती तालुक्यात २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषि संजीवनी मोहिमेचे आयोजन गावोगावी करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ रतन जाधव यांनी या वेळी शेतकरी बांधवांना विविध शेती उपयोगी विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष गोडसे यांनी विविध फळझाडांची लागवड व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर १०० शेतकरी बांधवांना फळझाडांचे वाटप करण्यात आले. या वेळी कृषि दिनाचे औचित्य साधून रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या ज्वारी व हरभरा पीक स्पर्धेत जिल्हा व तालुकापातळीवर चांगले यश मिळवलेल्या १२ शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे- जिल्हास्तर, पीक- हरभरा प्रथम क्रमांक- छाया तानाजी पवार (कुरणेवाडी), द्वितीय क्रमांक- पांडुरंग नारायण कोकरे (धुमाळवाडी), तृतीय क्रमांक- राजे्ंद्र दादासो पोमणे (माळवाडी लोणी) पीक-ज्वारी, प्रथम क्रमांक- अशोक पाटील तावरे (मौजे माळेगाव खु.) द्वितीय क्रमांक - भाऊसाहेब आनंदराव बागल (उंडवडी क.प.) तृतीय क्रमांक - हेमंत प्रतापराव भगत (ढाकाळे) तालुकस्तरीय विजेत्या स्पर्धकांची नावे पीक- हरभरा, प्रथम क्रमांक- संजय रामचंद्र खोरे (बाबुर्डी) द्वितीय क्रमांक- मोहन सजेर्राव सकुंटे (वाघळवाडी) तृतीय क्रमांक- हरिश्चंद्र जगन्नाथ गायकवाड (माळेगाव बु.) पीक- ज्वारी, प्रथम क्रमांक- बापूराव आनंदराव बागल (उंडवडी क.प.) द्वितीय क्रमांक- मनिषा युवराज जराड (उंडवडी क.प.) तृतीय क्रमांक- पुष्पा संभाजी चौधरी (वढाणे) आदी स्पर्धक शेतकऱ्यांना गौरवण्यात आले.
या वेळी बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, तालुका कृषि अधिकारी दतात्रय पडवळ, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ रतन जाधव, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष गोडसे, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी भानुदास साळवे, जळगाव सुपेचे माजी सरपंच लक्ष्मण जगताप, ग्रामपंचायत सदस्या सुनब्बी मुजावर, पंचायत समितीचे कृषि अधिकारी संजय जगताप, कृषि पर्यवेक्षक प्रतापसिंह शिंदे, आत्मा बारामतीचे बीटीएम विश्वजित मगर, एटीएम गणेश जाधव, जळगाव सुपेचे ग्रामसेवक गणेश लडकत, कृषि सहायक निरंजन घोडके यांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
जळगाव सुपे येथे ‘कृषी दिन-कृषी संजीवनी’ सप्ताहाच्या समारोपप्रसंगी उपस्थित शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व पदाधिकारी.
०६०७२०२१-बारामती-०६