उजनीच्या पाण्याला तेलाचा तवंग
By admin | Published: March 18, 2016 02:58 AM2016-03-18T02:58:55+5:302016-03-18T02:58:55+5:30
उजनी पाणलोट क्षेत्रातील माळवाडी ते तरटगाव या भागातील भीमा नदीच्या पाण्यावर जागोजाग काळसर तेलाचा तवंग आल्याचे गेल्या दोन तीन दिवसांपासून दिसत असल्याची स्थानिक
इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रातील माळवाडी ते तरटगाव या भागातील भीमा नदीच्या पाण्यावर जागोजाग काळसर तेलाचा तवंग आल्याचे गेल्या दोन तीन दिवसांपासून दिसत असल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे.
इंदापूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजना माळवाडी नंबर २ गावच्या हद्दीत येत आहे. आधीच उजनी पाणलोट क्षेत्रातील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर या काळसर तेलकट तवंगामुळे इंदापूरच्या नागरिकांसह, पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना काळे पाणी पिण्याची शिक्षा मिळणार आहे. तत्पूर्वी पाणी शुध्दीकरणाची प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत आहे.
गेल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्णातील साखर कारखाने मळीचे दुषित पाणी नदीच्या पात्रात सोडत आहेत. त्याच बरोबर वाळू उपश्याचा बिमोड करण्यासाठी महसूल विभागाने बोटींचे स्फोट केल्याने त्यातील अवशेष पाण्यात मिसळून पाणी दूषित झाल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.