ओजस, आरव, माया, हरिथाश्री यांना दुहेरी मुकुटाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:10+5:302021-03-13T04:20:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित पंधराव्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित पंधराव्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल बारा वर्षांखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात दिल्लीच्या ओजस मेहलावट, हरियाणाच्या आरव चावला यांनी, तर मुलींच्या गटात कर्नाटकाच्या हरिथाश्री वेंकटेश, तामिळनाडूच्या माया राजेश्वरन यांनी दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित दिल्लीच्या ओजस मेहलावट याने महाराष्ट्राच्या आयुश पुजारीचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या आरव चावलाने महाराष्ट्राच्या अमोघ दामलेचा पराभव केला. दुहेरीत अंतिम फेरीत ओजस मेहलावत व आरव चावला यांनी प्रतिक शेरॉन व रुद्र बाथम यांचा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या हरिथाश्री वेंकटेश हिने महाराष्ट्राच्या मेहक कपूरचा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूच्या दुसऱ्या मानांकित माया राजेश्वरन हिने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित प्रिशा शिंदेचा पराभव केला. दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत हरिथाश्री वेकंटेशने माया राजेश्वरनच्या साथीत स्निग्धा कांता व जीडी मेघना यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्य (मुख्य ड्रॉ) फेरी :
मुले : ओजस मेहलावट, दिल्ली (३) वि.वि. आयुश पुजारी, महाराष्ट्र ६-४, ६-२,
आरव चावला, हरियाणा (२) वि.वि. अमोघ दामले, महाराष्ट्र (१४) ६-४, ६-१,
मुली:
हरिथाश्री वेंकटेश, कर्नाटक (३) वि.वि. मेहक कपूर, महाराष्ट्र ६-१, ६-१,
माया राजेश्वरन, तामिळनाडू (२) वि.वि. प्रिशा शिंदे, महाराष्ट्र (५) ६-०, ६-३,
दुहेरी गट :
उपांत्य फेरी : मुली :
हरिथाश्री वेकंटेश-माया राजेश्वरन (१) वि.वि. प्रिशा शिंदे-नीलाक्षी लाथेर (३) ५-७, ७-६ (१), १०-६,
स्निग्धा कांता-जीडी मेघना वि.वि. ह्रितिका कपले-आराध्या वर्मा ६-०, ६-२;
अंतिम फेरी : हरिथाश्री वेकंटेश-माया राजेश्वरन (१) वि.वि. स्निग्धा कांता-जीडी मेघना ६-०, ६-१;
मुले : उपांत्य फेरी : ओजस मेहलावत-आरव चावला (१) वि.वि. श्लोक चौहान-देव पटेल ६-१, ६-१,
प्रतिक शेरॉन-रुद्र बाथम (२) वि.वि. द्रोण सुरेश-तविश पाहवा (४) ६-०, ६-१,
अंतिम फेरी : ओजस मेहलावत-आरव चावला (१) वि.वि. प्रतिक शेरॉन-रुद्र बाथम (२) ६-१, ६-०.