सुनेच्या छळाला कंटाळून सासु-सासऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; सुनेसह तिच्या आईवर गुन्हा दाखल

By रोशन मोरे | Published: August 11, 2023 06:45 PM2023-08-11T18:45:34+5:302023-08-11T18:48:09+5:30

पोलिसांनी सुन आणि तिच्या आईवर गुन्हा दाखल केला...

old couple ended their life harassment of daughter-in-law's pune latest crime news | सुनेच्या छळाला कंटाळून सासु-सासऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; सुनेसह तिच्या आईवर गुन्हा दाखल

सुनेच्या छळाला कंटाळून सासु-सासऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; सुनेसह तिच्या आईवर गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : सुन आणि तिच्या आईच्या त्रासाला कंटाळून शरद मेसी (वय ६८) आणि त्याची पत्नी (वय ६२) यांनी आत्महत्या केली. ही घटना २७ ऑक्टोबर २०२२ सकाळी साडेदहाच्या सुमारास रिव्हर सोसायटी, रावेत येथे घडली. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विशाल जाधव यांनी रावेत पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.१०) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सुन आणि तिच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर २०२२ ला शरद मेसी आणि त्यांच्या पत्नीने घरातील बेडरुमध्ये फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येविषयी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये सुन आणि तिची आई आपला छळ करत असल्याने त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. मात्र, शरद मेसी यांच्या मुलाने तसेच मुलीने देखील असे काही घडत नसल्याचे सांगत तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे चिठ्ठीच्या आधारे वरिष्ठांशी चर्चा करून सुनेवर आणि तिच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: old couple ended their life harassment of daughter-in-law's pune latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.