वन विभागातील जुने दस्तऐवज जतन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:00+5:302021-07-17T04:09:00+5:30

पुणे - वानवडी, वानवडीतील वन विभागाच्या कर्मचारी निवासस्थान इमारतीचे मॉडेल परिक्षेत्र कार्यालयात रुपांतरीत केले आहे. त्यामध्ये कार्यालयीन कक्ष, क्षेत्रीय ...

Old documents from the forest department will be preserved | वन विभागातील जुने दस्तऐवज जतन होणार

वन विभागातील जुने दस्तऐवज जतन होणार

Next

पुणे - वानवडी, वानवडीतील वन विभागाच्या कर्मचारी निवासस्थान इमारतीचे मॉडेल परिक्षेत्र कार्यालयात रुपांतरीत केले आहे. त्यामध्ये कार्यालयीन कक्ष, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे दालन, जुने दस्तऐवज जतन करण्यासाठी स्वतंत्र स्टोअर रूम तयार केली आहे. याव्यतिरिक्त वनसंरक्षणाचे वेळी वापरण्यात येणारी संसाधने ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या कार्यालयाचे उद‌्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुक्रवारी झाले.

वानवडी येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची पाहणी अजित पवार यांनी केली. या वेळी वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री. जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण वाय. एल. पी. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे वनवृत्तचे सुजय दोडल, पुणे (प्रा.) वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहायक वनसंरक्षक पुण्याचे आशुतोष शेंडगे, पुण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुणे वनपरिक्षेत्र कार्यालय स. नं. ४९ साळुंके विहार वानवडी येथील वनवसाहतीमधील निवासस्थानाच्या इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

***

फोटो ओळ-

वानवडी, पुणे येथील नूतनीकरण केलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Old documents from the forest department will be preserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.