जुने प्रकल्प, योजना नव्या स्वरूपात

By admin | Published: January 8, 2016 01:33 AM2016-01-08T01:33:28+5:302016-01-08T01:33:28+5:30

गृहयोजनेचा विषय दर वर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पात मागील पानावरून पुढील पानावर येत होता. २००८पासून प्रलंबित असणारी सेक्टर १२मधील आणि २०१२मधील वाल्हेकरवाडीतील

Old projects, plans in new format | जुने प्रकल्प, योजना नव्या स्वरूपात

जुने प्रकल्प, योजना नव्या स्वरूपात

Next

पिंपरी : गृहयोजनेचा विषय दर वर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पात मागील पानावरून पुढील पानावर येत होता. २००८पासून प्रलंबित असणारी सेक्टर १२मधील आणि २०१२मधील वाल्हेकरवाडीतील योजना प्रलंबित होती. या गृहयोजनेस मुहूर्त सापडला आहे. अर्थसंकल्पात अर्थिक तरतूद केल्याने दोन्ही प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
अर्थसंकल्पातील प्रस्तावित योजनाविषयी माहिती देताना विभागीय आयुक्त चोक्कलिंगम म्हणाले, ‘‘नागरिकांना घरे उपलब्ध करून देणे हे प्राधिकरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मात्र, गृहयोजनांना आवश्यक असणाऱ्या पर्यावरणविषयक परवानग्या मिळत नव्हत्या, तसेच सेक्टर १२मधील गृहयोजनेबाबत न्यायालयीन वाद होता. हा प्रश्न सुटला आहे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे गृहप्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे. अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ही घरे असतील. वन आरके आणि वन बीएचके अशा दोन प्रकारातील सदनिका उभारण्यात येणार आहेत. पेठ क्रमांक ३०मधील आठशे सदनिकांच्या योजनेसाठी ४० कोटींची तरतूद केली आहे. तसेच भोसरी, इंद्रायणीनगर प्राधिकरणातील सेक्टर १२मध्ये सुमारे आठ हजार घरे उभारण्यात येणार आहेत. वाल्हेकरवाडीतील गृहयोजनेची सुरुवात येत्या महिनाभरात होईल.’’
(प्रतिनिधी)

Web Title: Old projects, plans in new format

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.