वृद्धांची सुरू आहे वयाशी स्पर्धा

By admin | Published: November 25, 2014 11:32 PM2014-11-25T23:32:49+5:302014-11-25T23:32:49+5:30

ज्येष्ठ म्हटल्यावर डोळ्य़ासमोर सुरकुत्या पडलेला चेहरा येतो. पण आजच्या ज्येष्ठांकडे पाहिल्यावर तरुणांना सुद्धा लाजवेल असा उत्साह व तारुण्य जेष्ठांच्या चेह:यावर दिसते.

Older people are competing in the age group | वृद्धांची सुरू आहे वयाशी स्पर्धा

वृद्धांची सुरू आहे वयाशी स्पर्धा

Next
पुणो : ज्येष्ठ म्हटल्यावर डोळ्य़ासमोर सुरकुत्या पडलेला चेहरा येतो. पण आजच्या ज्येष्ठांकडे पाहिल्यावर तरुणांना सुद्धा लाजवेल असा उत्साह व तारुण्य जेष्ठांच्या चेह:यावर दिसते. स्पर्धेच्या युगात ज्येष्ठ लोक विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन स्वत:च्या वयाशीच स्पर्धा करतात, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई वैद्य यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पर्वतीभूषण पुरस्कार व पर्वती चढणो-उतरणो स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभात वैद्य बोलत होते. त्यांच्या हस्ते श्रीधर ताम्हणकर यांना पर्वतीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1क् हजार रुपये, स्मृतिचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते. पर्वती चढणो उतरणो स्पर्धेतील विजेत्यांना देखील 1क्क्क् रुपये व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. या वेळी अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, रमेश बोडके आदी उपस्थित होते.
वैद्य म्हणाले, ‘‘अशा स्पर्धात्मक कार्यक्रमात सहभागी होणा:या ज्येष्ठांचा उत्साह पाहुन मला प्रेरणा मिळाली. भारतातील सर्व वृद्धांनी अशाप्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन तरुण बनावे. तसेच हा उपक्रम जागतिक व्हावा असे वाटते.’’
सूत्रसंचालन शांतिलाल सुरतवाला यांनी केले. (प्रतिनिधी)
 
13 वर्षे सातत्याने हा उपक्रम चालु आहे. परंतु आजर्पयत एकदाही कोणत्या स्पर्धकाला काही ईजा होऊन अॅम्ब्युलन्स किंवा औषधांची गरज लागली नाही. हाच त्यांचा उत्साह आम्हाला आनंद देतो.
-अंकुश काकडे

 

Web Title: Older people are competing in the age group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.