ओमप्रकाश गोयंका अटकेत, रॉयल ट्विंकल स्टार क्लब फसवणूक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 03:30 AM2018-06-14T03:30:48+5:302018-06-14T03:30:48+5:30

रॉयल ट्ंिवकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपन्यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणातील मुख्य संचालक ओमप्रकाश गोयंका यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

 Om Prakash Goenka caught, Royal Twinkle Star Club cheating case | ओमप्रकाश गोयंका अटकेत, रॉयल ट्विंकल स्टार क्लब फसवणूक प्रकरण

ओमप्रकाश गोयंका अटकेत, रॉयल ट्विंकल स्टार क्लब फसवणूक प्रकरण

googlenewsNext

पुणे : रॉयल ट्ंिवकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपन्यांनी केलेल्या फसवणूक प्रकरणातील मुख्य संचालक ओमप्रकाश गोयंका यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे़ त्यांना न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़
रॉयल ट्ंिवकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स या कंपनीने केलेल्या फसवणूकीत आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ३ हजार १३५ गुंतवणुकदारांनी ४१ कोटी ३ लाख २० हजार ९६८ रुपयांची फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी देण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय विश्वनाथ पटवर्धन यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार रॉयल ट्विंकल स्टार क्लब व सिट्रस चेक इन्स (वडाळा मुंबई) या कंपनीचे संचालक ओमप्रकाश वसंतलाल गोयंका (वय ६८, रा़ मुंबई) प्रकाश गणपत उत्तेकर (रा़ मुंबई), नटराजन व्यंकटरामन (अय्यर) ऊर्फ व्ही. नटराजन (रा़ वडाळा, मुंबई), एल. एस. कोटणीस (रा़ सायन पूर्व, मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरोधात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे १९ लाख २४ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आली होती. त्याबरोबरच नाशिक येथील लासलगाव पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई व अहमदनगर येथेही गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडे आलेल्या ३ हजार १३५ जणांची ४१ कोटी ३ लाख २० हजार ९८६ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी व कंपनीचे संस्थापकीय संचालक ओमप्रकाश वसंतलाल गोयंका यांना नाशिक कारागृह येथून तपासासाठी अटक करण्यात आली. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायालयाने १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर कंपनीकडून शहरातील फसवणूक झालेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title:  Om Prakash Goenka caught, Royal Twinkle Star Club cheating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.