बापरे ! पुण्यात दररोज घडताहेत 32 सायबर क्राईम ; ज्येष्ठ व्यक्ती महिलांना केले जाते 'टार्गेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:53 AM2020-06-26T10:53:24+5:302020-06-26T10:54:19+5:30

पोलिसांकडून वारंवार जनजागृती, आवाहन करून देखील असंख्य लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडतात.

OMG! 32 cyber crimes occur daily in Pune; Elderly women are 'targeted' | बापरे ! पुण्यात दररोज घडताहेत 32 सायबर क्राईम ; ज्येष्ठ व्यक्ती महिलांना केले जाते 'टार्गेट'

बापरे ! पुण्यात दररोज घडताहेत 32 सायबर क्राईम ; ज्येष्ठ व्यक्ती महिलांना केले जाते 'टार्गेट'

googlenewsNext
ठळक मुद्दे62 टक्के गुन्हे डेबिट आणि क्रेडीट कार्डचे

विवेक भुसे

पुणे : लॉकडाऊनच्या काळात देशभरात सर्व व्यवहार बंद असल्याने चोरटेही घरात बसून होते. त्यामुळे गुन्हे, अपघातांच्या संख्येत मोठी घट आली असतानाच सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात पुण्यात दररोज सरासरी ३२ सायबर गुन्हे घडत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ६२ टक्क्यांहून अधिक गुन्हे हे केवळ नागरिकांनी आपल्या बँकेचे गोपनीय क्रमांक सायबर चोरट्यांना शेअर केल्यामुळे घडले असल्याचे दिसून येत आहेत. 

पेटीएम व्हेरिफिकेशन, केवायसी अपडेटच्या नावाखाली सायबर चोरटे ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष्य करुन त्यांना बोलण्यात गुंतवून अकाऊंट बंद होण्याची भीती दाखवितात व ते सुरु ठेवण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून गोपनिय माहिती घेतात. किंवा त्यांना एखादी लिंक पाठवून त्यावर सर्व माहिती भरुन पाठविण्यास सांगतात. त्याद्वारे डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून त्याद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करत असतात. डेबिड, क्रेडिट कार्डचा वापर करुन आतापर्यंत सर्वाधिक २०७१ तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत़ त्याचबरोबर डेबिट, क्रेडिट कार्डशिवाय पैसे ट्रान्सफर झाल्याच्या ५१७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

बँका, पोलीस वारंवार गोपनीय क्रमांक, ओटीपी कोणाला शेअर करु नका,  असे सांगत असतात़ तरीही ओटीपी शेअर केल्याने फसवणूक झाल्याच्या २३८ तक्रार अर्ज मिळाले आहेत. 

कार्ड क्लोन करुन १८९ जणांची फसवणूक झाली आहे. तर नोकरीच्या आमिषाने १८९ जणांची फसवणूक झाली आहे. कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने १७६ जणांची फसवणूक झाली आहे. 

ओएलएक्स या खरेदी विक्री पोर्टलवरुन तब्बल ५८३ जणांना गंडा घालण्यात आला आहे. तर आॅनलाईन खरेदी विक्रीबाबत ४१५ जण सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. 

आतापर्यंत सोशल नेटवर्किंग साईटवरुन फसवणूक झाल्याचे २८० तक्रारी दाखल आहेत. 

शहरातील वाढते सायबर गुन्हे लक्षात घेऊन शहर पोलीस दलात गेल्या वर्षी जुलैपासून स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. त्यामार्फत नागरिकांना सातत्याने मार्गदर्शन व आवाहन करण्यात येते. मात्र, तरीही असंख्य लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडताना दिसत आहेत. 

़़़़़़़़़़़़

२०१८ मध्ये शहरात ५ हजार ५०० सायबर गुन्ह्यांबाबत तक्रारी आल्या होत्या़ त्यात २०१९ मध्ये तब्बल २ हजार २९५ ने वाढ होऊन ७ हजार ७९५ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०२० मध्ये सायबर गुन्ह्यात वेगाने वाढ होत आहे़ वर्षातील पहिले ६ महिने संपण्याअगोदरच जवळपास गतवर्षी इतकेच ५ हजार ७५५ सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी आल्या आहेत.

़़़़़़़़़़

बँका अथवा कोणीही केवायसी अपडेट करण्यासाठी सांगत नाही़ त्यामुळे नागरिकांना जर असे कोणतेही एसएमएस अथवा फोन कॉल आला तर त्यांनी ते घेऊन नयेत. तसेच त्यांना आपल्याबाबतची अथवा बँकेची माहिती देऊ नये.

जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

डेबिट, क्रेडिट कार्डचे गुन्हे २०७१ 

ओटीपी शेअर २३८

कार्ड क्लोनिंग १८९

नोकरीच्या आमिषाने फसवणूक १८९

कर्जाच्या आमिषाने फसवणूक १७६

ओएलएक्स द्वारे फसवणूक ५८३

आॅनलाईन खरेदीविक्री फसवणूक ४१५

सोशल मिडियाद्वारे गुन्हे २८०

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

एकूण ५७५५

Web Title: OMG! 32 cyber crimes occur daily in Pune; Elderly women are 'targeted'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.