अबब... कोथिंबीर गड्डी 50 रुपये; फळभाज्यांचे दर पुन्हा तेजीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:52 PM2020-08-30T18:52:03+5:302020-08-30T18:53:09+5:30
पावसामुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक चांगलीच कमी झाली हे. याचा परिणाम व आवक घटल्याने कांदा, हिरवी मिरची, दुधी भोपळा, टोमॅटो, दोडका, कारली, फ्लॉवर, शेवगा यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फार मोठा फटका पालेभाज्यांना बसला आहे. याचच परिणाम कोथिंबीरच्या दरावर झाला असून, रविवारी किरकोळ बाजारात कोथिंबीरच्या गड्डीला हंगामातील उच्चांकी 50 रुपये गड्डी दर मिळाले.
पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यातुलनेत मागणी वाढल्याने बहुतांश सर्व पालेभाज्यांचे दर वाढले आहे. कोथिंबीरीची घाऊक बाजारात एक गड्डी २० ते ३५ रूपयांवर पोहचली असून किरकोळ बाजारात ४५ ते ५० रूपयांवर पोहचली असून, इतर पालेभाज्या २५ ते ३० रूपयांना एका गड्डीची विक्री केली जात आहे. रविवारी कोथिंबीरची ८० हजार जुडी, तर मेथीची ६० हजार जुडी इतकी आवक झाली.
पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) : कोथिंबीर : २०००-३५००, मेथी : ७००-१२००, शेपू : ५००-८००, कांदापात : ७००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ८००-१०००, पुदिना : ३००-५००, अंबाडी : ७००-८००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ७००-८००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-६००, पालक : ६००-८००.
पावसामुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक चांगलीच कमी झाली हे. याचा परिणाम व आवक घटल्याने कांदा, हिरवी मिरची, दुधी भोपळा, टोमॅटो, दोडका, कारली, फ्लॉवर, शेवगा यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवक वाढल्याने आलेचे दर कमी झाले आहेत. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे इतर फळभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.30) रोजी केवळ ७० ते ८० ट्रक शेतमालाची आवक झाली. यामधून स्थानिक शेतीमालसह परराज्यातील शेतीमालाचा समावेश आहे. यात प्रामुख्याने परराज्यांतून आलेल्या मालामध्ये गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, इंदूर येथून ८ ते १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची ४ ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १६०० ते १७०० पोती, मटार १२५ पोती, कोबी ३ ते ४ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टॉमेटो १५०० ते २ हजार व्रेâट्स, भुईमूग शेंग १०० पोती, भेंडी ८ ते १० टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा ७ ते ८ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, घेवडा ३ टेम्पो, कांदा ४० ते ५० ट्रक, आग्रा व इंदूर येथून २५ ट्रक बटाटा इतकी आवक झाली, अशी माहिती आडते विलास भुजबळ यांनी दिली.