बाप रे! पुणे पोलिसांनी कोरोना लॉकडाऊन काळात दिले एवढे 'ई-पास'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 09:13 PM2020-08-31T21:13:17+5:302020-08-31T21:19:09+5:30

पुणे पोलिसांनी डिजिटल पासची सुविधा २४ मार्चपासून सुरु केली होती. 

OMG! So many 'e-passes' issued by Pune police during Corona lockdown | बाप रे! पुणे पोलिसांनी कोरोना लॉकडाऊन काळात दिले एवढे 'ई-पास'

बाप रे! पुणे पोलिसांनी कोरोना लॉकडाऊन काळात दिले एवढे 'ई-पास'

googlenewsNext

पुणे : राज्य शासनाने १ सप्टेंबरपासून वाहतूकीवरील बंधने दूर केल्याने आता आंतर जिल्हा प्रवासासाठी ई पास लागणार नाही. पुणेपोलिसांची डिजिटल पासची सुविधा पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मार्चपासून सुरु करण्यात आली होती.

 याबाबत बच्चनसिंग यांनी सांगितले की, डिजिटल पासची सुविधा २४ तास सुरु होती. ज्यांना वैद्यकीय कारणासाठी पुण्याबाहेर जाणे आवश्यक होते.त्यांना तातडीने पास उपलब्ध करुन दिले जात होते.

लॉकडाऊन काळात पुणे पोलिसांनी पुण्यात अडकलेल्या ४ लाख २ हजार २४३ जणांना घरी जाण्यासाठी डिजिटल पास उपलब्ध करुन दिला. त्याचवेळी वैद्यकीय कारणासाठी ६८ हजार ३८ जणांना ई पास देण्यात आले आहेत.

मृत्यु पावलेल्यांचे नातेवाईक १८,६१२

गंभीर वैद्यकीय कारण ७९,७७९

अडकलेले विद्यार्थी २०,२८५

अडकलेले वैयक्तिक नागरिक १,१६,३९३

इतर अडकलेले नागरिक १,६६,६३४

़़़़़़़़

वैद्यकीय कारणासाठी दिलेले ई पास

कॅन्सर ९,६१७

आयसीयु ९,५३०

सर्जरी ८,७१०

डायलेसिस ६,५१९

डायबेटिक ४,२१६

गर्भवती १,४८,८१२

व्हॅक्सिन, मुले ५,००१

मृत्यु ९,६३३

Web Title: OMG! So many 'e-passes' issued by Pune police during Corona lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.