Omicron: पुणे जिल्ह्यात ऐन ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 06:20 PM2021-12-25T18:20:22+5:302021-12-25T18:24:20+5:30

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील निर्बंधा संदर्भात शनिवारी स्वतंत्र आदेश काढले आहेत...

omicron strict restrictions on hotels and restaurants christmas thirty first new year in pune | Omicron: पुणे जिल्ह्यात ऐन ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध

Omicron: पुणे जिल्ह्यात ऐन ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध

Next

पुणे : राज्यासह जिल्ह्यात ओमायक्रॉन व कोरोना (omicron varient pune) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या ऐन हंगामात पुन्हा एखदा हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर पन्नास टक्क्यांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव अस असल्याने रात्रीच्या पार्ट्या देखील एक प्रकारची बंदी आली आहे. या नव्या निर्बधामुळे हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर व्यावसायिकासह नववर्षांच्या स्वागतासाठी तयारीत असलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील निर्बंधा संदर्भात शनिवारी स्वतंत्र आदेश काढले आहेत. यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह  पुणे जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार निर्बंध लागू केले आहेत. जिल्ह्यात शनिवारपासून (दि.25) पासून पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. यात सध्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात देखील ओमायक्रॉन व कोरोना रुग्णांची संख्या गेल्या दोन आठवड्यात वाढ असताना दिसत आहे. येत्या काही दिवसात नाताळ, लग्न सराई, इतर सणवार व नविन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ लोकांची गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सदयसिधीतील निर्बंधांपेक्षा अधिक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. यामुळेच जिल्हाधिकारी यांनी खालील निर्बंध लागू केले आहेत.

जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागासाठीचे निर्बंध-

  • हाॅटेल्स,  रेस्टॉरंट, जिम, स्पा, सिनेमा व नाटयगृहे तेथील आसनक्षमतेच्या ५०% मर्यादेच्या अधिन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहील. परंतू तेथे एकुण आसनक्षमता व परवानगी देण्यात आलेली ५०% क्षमता याबाबत सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावा.
  • विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी अधिकतम १०० उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. असे समारंभ मोकळया जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त २५० व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या २५% यापैकी जो संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.
  • अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी अधिकतम १०० उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. असे समारंभ मोकळया जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त २५० व त्याठिकाणाच्या क्षमतेच्या २५ % यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.
  • वर नमूद केलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांचे आयोजन बंद जागेमध्ये करित असतांना आसन व्यवस्था फिक्स असलेल्या ठिकाणी त्याजागेच्या ५०% क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे, तसेच बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था फिक्स नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करित असतांना व आसन व्यवस्था त्याजागेच्या २५% क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. असे कार्यक्रम मोकळया जागेमध्ये आयोजित करतांना त्याजागेच्या क्षमतेच्या २५% पेक्षा अधिक उपस्थिती राहाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • क्रिडास्पर्धा व सामन्यांचे आयोजन करतांना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम २५% उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी. 

Web Title: omicron strict restrictions on hotels and restaurants christmas thirty first new year in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.