Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:52 PM2021-12-24T12:52:37+5:302021-12-24T12:52:45+5:30

पोर्टलवर लसीकरणानंतर तातडीने नोंद घेण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले

omicron variant is growing in pune take the second dose Collectors order | Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next

पुणे : कोव्हीड लशीची दुसरी मात्रा देण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावे आणि पोर्टलवर लसीकरणानंतर तातडीने नोंद घेण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा स्तरीय कृतीदल समिती आणि आरोग्य विषयक विविध समित्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार उपस्थित होते. 

डॉ.देशमुख म्हणाले, गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोनाबधितांच्या प्रमाणात किंचित वाढ झाली आहे.ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि कटक मंडळ भागात कोव्हीड चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी. ओमायक्रॉंनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी केली जाईल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. 

जानेवारी महिन्यात होणाऱ्या पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, मोहिमेअंतर्गत स्थलांतरीत कामगारांच्या वस्त्यांमधील बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे.  जिल्ह्यातील उद्योग आणि साखर कारखान्यातील मजुरांना पोलिओ कार्यक्रमाविषयी माहिती देण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. घंटागाडी आणि इतर माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात यावा. 

राज्यात ओमायक्रॉनचे २३ तर पुण्यात १३ रुग्ण 

राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७, पुणे शहरातील ३ आणि पुणे ग्रामीणमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतून गुरुवारी हे अहवाल प्राप्त झाले. बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित असून ६ जणांना सौम्य लक्षणे आहेत. 

Web Title: omicron variant is growing in pune take the second dose Collectors order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.