ओमकार ठिकेकरची पेंटॅथलाॅन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:37 IST2024-12-23T18:36:27+5:302024-12-23T18:37:23+5:30
मागील आठवड्यात पुणे विभागीय क्रीडा संकुल, येरवडा या ठिकाणी या स्पर्धा झाल्या.

ओमकार ठिकेकरची पेंटॅथलाॅन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
ओतूर : पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्यावतीने आयोजित विभागीय शालेय मॉडर्न पेंटॅथलाॅन या स्पर्धेत ग्रामविकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयाचा विद्यार्थी ओमकार अमोल ठिकेकर याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
मागील आठवड्यात पुणे विभागीय क्रीडा संकुल, येरवडा या ठिकाणी या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत चैतन्य विद्यालयाच्या ओमकार अमोल ठिकेकर या विद्यार्थ्याने पुणे विभागात चतुर्थ क्रमांक मिळवला. त्याची सातारा या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मॉडर्न पेंटॅथलाॅन स्पर्धेसाठी निवड झाली. त्याला क्रीडा शिक्षक अमित झरेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, संजय हिरे, अनिल उकिरडे, शरद माळवे, देवचंद नेहे, विजया गडगे, संतोष सोनवणे आदींनी ओमकारचे अभिनंदन केले आहे.