संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंद आणि हुरहूर; खासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मिडीयावर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:00 PM2023-09-18T22:00:24+5:302023-09-18T22:00:37+5:30

संसदेच्या या जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून ती नव्या वास्तूत स्थलांतरित होत आहे.

On entering the new building of Parliament | संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंद आणि हुरहूर; खासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मिडीयावर पोस्ट

संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना आनंद आणि हुरहूर; खासदार सुप्रिया सुळे यांची सोशल मिडीयावर पोस्ट

googlenewsNext

बारामती - संसदेच्या या जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून ती नव्या वास्तूत स्थलांतरित होत आहे. जुन्या वास्तूचा निरोप घेऊन नव्या वास्तूत प्रवेश करीत असताना एकाच वेळी आनंद आणि हुरहूर अशा दोन्ही भावना दाटून आल्या आहेत,अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या नुतन वास्तूतील स`थलांतराबाबत सोशल मिडीयावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

   सुळे यांनी सोशल मिडीयावर म्हणतात, बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून २००९ साली सर्वप्रथम लोकसभेत आपण सर्वांनी मला निवडून दिले. तेंव्हापासून २०१४ आणि २०१९ असे सलग तीनवेळा आपण मला आपली प्रतिनिधी म्हणून निवडून लोकसभेत पाठविले.
आजपर्यंत आपल्या सर्वांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत महाराष्ट्रातील जनतेचा, समाजातील शेवटच्या माणसापासून प्रत्येक घटकाचा आवाज लोकशाहीच्या मंदिरात पोहचविण्याचा प्रांजळ प्रयत्न करत आहे. आपण मला हि संधी उपलब्ध करून दिली याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.

संसदेच्या या जुन्या वास्तूत अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचाही सहवास लाभला. खुप काही शिकताही आलं.  नव्या वास्तूत प्रवेश करीत असताना एकाच वेळी आनंद आणि हुरहूर अशा दोन्ही भावना दाटून आल्याचे सुळे यांनी नमुद केले आहे.

Web Title: On entering the new building of Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.