Pune: गॅस सिलिंडर वापरणारे पथारीधारक, वितरकांवरही होणार गुन्हे; PMC करणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 08:45 PM2023-06-30T20:45:52+5:302023-06-30T20:48:18+5:30

आता गॅस सिलिंडर वापरणारे पथारीधारक, वितरकांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत....

on road distributors who use gas cylinders will also be charged; PMC will take action | Pune: गॅस सिलिंडर वापरणारे पथारीधारक, वितरकांवरही होणार गुन्हे; PMC करणार कारवाई

Pune: गॅस सिलिंडर वापरणारे पथारीधारक, वितरकांवरही होणार गुन्हे; PMC करणार कारवाई

googlenewsNext

पुणे : शहरातील पथारी व्यावसायिकांना महापालिकेने दिलेल्या परवान्यानुसार पथारीच्या ठिकाणी अन्नपदार्थ शिजविण्यास अथवा तयार करण्यास बंदी आहे. तरीही अनेक पथारीधारक गॅस सिलिंडर वापरत आहेत. त्यामुळे पालिकेने या व्यावसायिकांकडून १ हजार २१ गॅस सिलिंडर जप्त केले. आता गॅस सिलिंडर वापरणारे पथारीधारक, वितरकांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

महापालिकेकडून कारवाई सुरू असतानाही अनेकजण सिलिंडर वापरत असल्याने प्रशासनाने या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अतिक्रमण विभाग, पोलिस विभाग, अन्न पुरवठा विभाग व गॅस वितरक कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. शहरात रस्ता-पदपथावर जे पथविक्रेते अनधिकृतपणे सिलिंडरचा वापर करताना आढळले अशा पथविक्रेत्यांवर सिलिंडर जप्तीची कारवाई करण्यात आली. संबंधित व्यावसायिकांवर व वितरकांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्याची कारवाई चालू होणार आहे, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

Web Title: on road distributors who use gas cylinders will also be charged; PMC will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.