अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन खरेदी जोरात, तरी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांची विक्री कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 09:58 PM2023-04-22T21:58:16+5:302023-04-22T21:59:09+5:30
पुण्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांची विक्री कमी झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
पुणे : अक्षय तृतीयेला केलेली गोष्ट अनंत काळ टिकते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाचं महत्व विशद केलं जातं. दुचाकी किंवा चारचाकी घेण्याआधी प्रत्येकजण शुभ मुहूर्त पाहत असतो. त्यामुळे या दिवशी वाहन खरेदी करणे योग्य मानले जाते. असे केल्याने त्या वाहनांमधून केलेला प्रवास सुरक्षित होतो अशी देखील काही लोकांची भावना आहे. पुण्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहनांची विक्री कमी झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
दरवर्षी अक्षय तृतीया, बलिप्रतिपदा, गुढीपाडवा, दसरा या साडेतीन मुहूर्तांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन वाहन, घर अथवा नवीन कोणत्याही वस्तूची खरेदी केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ९१ वाहने कमी नोंदणी गेल्याचे यंदाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. तसेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा वाहन विक्रीचे प्रमाण कमी असल्याचे वाहन विक्रेत्यांनी देखील सांगितले.
२६ एप्रिल ते ३ मे २०२२ दरम्यान नोंदणी झालेली वाहने...
१) दुचाकी - २ हजार ८४०
२) कार - १ हजार ९७२
३) गुड्स वाहने - २१३
४) रिक्षा - ४०
५) बस - ३८
६) अन्य वाहने - ९५
एकूण - ५ हजार १९८
१५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेली वाहने..
१) दुचाकी - ३ हजार ५१
२) कार - १ हजार ३४३
३) गुड्स वाहने - ३२५
४) रिक्षा - १८६
५) बस - २३
६) अन्य वाहने - २२४९८
एकूण - ५ हजार १५२
२६ एप्रिल ते ३ मे २०२२ दरम्यान नोंदणी झालेली इलेक्ट्रिक वाहने...
१) दुचाकी - ३९३
२) कार - २८
३) गुड्स वाहने - ०४
४) रिक्षा - ००
५) बस - ३६
एकूण - ४६१
१५ एप्रिल ते २२ एप्रिल २०२३ दरम्यान नोंदणी झालेली इलेक्ट्रिक वाहने..
१) दुचाकी - ३७०
२) कार - २६
३) गुड्स वाहने - ११
४) रिक्षा - ०९
५) बस - ००
एकूण - ४१६