सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने पळवले

By भाग्यश्री गिलडा | Published: January 17, 2024 06:22 PM2024-01-17T18:22:11+5:302024-01-17T18:23:16+5:30

एका अनोळखी व्यक्तीने दागिने पॉलिश करून देतो अशी बतावणी दागिने पळवले

On the pretext of polishing gold ornaments a woman jewelery worth fifty three lakhs was stolen | सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने पळवले

सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने पळवले

पुणे : सोन्या- चांदीचे दागिने पॉलिश करून देतो सांगत महिलेसह त्यांच्या मैत्रिणीची पावणेतीन लाखांचे दागिने पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.१६) पोलिसांत फिर्याद दिली आहे. १६ जानेवारी २०२४ रोजी घडला आहे. 

सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास फिर्यादी या त्यांच्या मैत्रिणीसोबत घरासमोर बसल्या असता एक अनोळखी व्यक्ती तेथे आला. दागिने पॉलिश करून देतो अशी बतावणी त्याने केली. फिर्यादी महिलेने सुरुवातीला त्यांना पैजण देऊन ते पॉलिश करण्यास सांगितले. आरोपींनी पैंजण पॉलिश करून दिल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर आम्ही सोन्याचे दागिनेही कमी किंमतीत पॉलिश करून देते असे सांगितल्यावर महिलेने त्यांना २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दिले. आरोपींनी सोन्याच्या दागिन्यांची पॉलिश करण्याचे नाटक करून परत देताना दागिन्यांचा रिकामा डबा दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यदिंनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दर्शना शेलार या करत आहेत.

Web Title: On the pretext of polishing gold ornaments a woman jewelery worth fifty three lakhs was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.