मुठा नदीपात्र पुन्हा जलपर्णीने व्यापले : प्रशासनाकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 05:25 PM2019-04-03T17:25:44+5:302019-04-03T17:29:57+5:30
महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या 26 कोटींच्या निविदेवरून पालिकेमध्ये राडा झाला होता...
पुणे : शहराच्या मध्यवस्तीमधून वाहणाऱ्या मुठा नदीपात्रामध्ये बुधवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर जलपर्णी यायला सुरुवात झाली. ही जलपर्णी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशी आली याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वारजे ते खडकवासला धरणादरम्यान साठलेली जलपर्णी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या 26 कोटींच्या निविदेवरून पालिकेमध्ये राडा झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या कक्षामध्ये ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. या प्रकरणावरून निंबाळकर यांनी नागरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जलपर्णी काढण्याच्या निविदेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
जलपर्णीवरून एवढा मोठा गदारोळ झालेला असताना नदीपात्र आणि शहरातील तलावातील जलपर्णी काढण्याच्या हालचाली मंदावल्या.
बुधवारी दुपारनंतर मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या जलपर्णी वाहात आली. सांडपाण्यासोबत आलेल्या जलपणीर्मुळे संपूर्ण नदीपात्र भरून गेले होते.
रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाणणी यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. दिवसेंदिवस जलपर्णीचा त्रास वाढत चालला आहे. दर वर्षी शहरातील नद्या आणि तलावांमधील जलपर्णी काढण्याच्या खचार्चे आकडे फुगत चालले आहेत.
यासोबतच जलपणीर्चे जलजीवसृष्टीवर होणारे दुष्परिणाम वेगळेच. मुठा, मुळा, पवना या नद्यासह पाषण, कात्रजच्या दोन तलावामध्ये दर वर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण होते. नदीकाठ आणि तलाव परिसरातील नागरिकांना डास आणि कीटकांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे एकंदर चित्र आहे