शिंदवणे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा महाडिक गटाचीच एकहाती सत्ता.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:50+5:302021-01-20T04:11:50+5:30
पूर्व हवेलीमधील शिंदवणे ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्र्या संवेदनशील असून, तेरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीवर मागील दहा वर्षांपासून अण्णा महाडिक ...
पूर्व हवेलीमधील शिंदवणे ही ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्र्या संवेदनशील असून, तेरा ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीवर मागील दहा वर्षांपासून अण्णा महाडिक गटाची सत्ता आहे. एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या दोन्ही पॅनेलकडून सत्तेसाठी वारेमाप खर्चही करण्यात आला होता. यामुळे या ग्रामपंचायतीची सत्ता अण्णा महाडिक राखणार की विरोधक सत्ता हिसकावून घेणार याकडे संपुर्ण पूर्व हवेलीचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, अण्णा महाडिक यांची सत्ता राखण्यासाठी हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली महाडिक, माजी सरपंच गणेश महाडिक व त्यांचे सहकारी प्रयत्नशील होते. अण्णा महाडिक जिल्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून, त्यांनी सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक १ - भाग्यश्री विनोद शिंदे, लता अशोक माने, ज्योती दत्तात्रय महाडिक (संत यादवबाबा पॅनेल). प्रभाग क्रमांक - २ - योगेश चंद्रकांत कुलाळ, प्रमिला कचरू शितोळे (संत यादवबाबा पॅनेल). प्रभाग क्रमांक - ३ - संगीता माणिक महाडिक (शिवछत्रपती ग्रामविकास पॅनेल), सारिका दिनानाथ महाडिक (संत यादवबाबा पॅनेल). प्रभाग क्रमांक - ४ - गणेश भाऊसाहेब महाडिक, मनीषा अण्णा महाडिक, शोभा आबासाहेब महाडिक (संत यादवबाबा पॅनेल) प्रभाग क्रमांक - ५ - सागर अशोक खेडेकर, ओंकार बाजीराव मांढरे (मल्हार विकास आघाडी) व कमल माणिक शिंदे (संत यादवबाबा पॅनेल).
. विजयी उमेदवारांचे सहित पॅनेल प्रमुख अण्णा महाडिक व गणेश महाडिक.