पुन्हा एकदा लसींचा तुटवडा, लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:26+5:302021-04-16T04:11:26+5:30

पुणे शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरण वाढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. प्रत्यक्षात पुरेशा लसी ...

Once again there is a shortage of vaccines, time to close vaccination centers | पुन्हा एकदा लसींचा तुटवडा, लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ

पुन्हा एकदा लसींचा तुटवडा, लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ

Next

पुणे शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरण वाढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. प्रत्यक्षात पुरेशा लसी उपलब्ध नाहीत, असे चित्र दिसत आहे. आजच्या आकडेवारीनुसार पुणे महापालिकेकडे फक्त १५० लसी शिल्लक आहेत. कोव्हिशिल्डचे ३२००० डोस हे रुग्णालयांना वाटले आहेत.

शहरातले एकूण दररोजचे लसीकरण पाहता या लसी साधारण दीड दिवस पुरतील. मात्र नव्याने येणाऱ्या साठ्याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेले नाहीये. त्यामुळे आज शहरातली अनेक केंद्रे बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली होती.

सध्या संपूर्ण शहरात लसीकरणाची एकूण १६० लसीकरण केंद्रे सुरु आहेत. याशिवाय नव्याने केंद्र सुरु करण्याची तयारी अनेक खासगी रुग्णालयांकडून झाली आहे. महापालिकेच्या देखील नव्या जागा तयार आहेत. पण लसी उपलब्ध होत नसेल तर ही केंद्र सुरु करायची कशी, असा प्रश्न सध्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

कोव्हॅक्सिन शिल्लक आहे, मात्र हे डोस प्रामुख्याने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी वापरले जात आहेत.

Web Title: Once again there is a shortage of vaccines, time to close vaccination centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.