एक गावठी पिस्तूल २ जिवंत काडतुसांसह एक आरोपी जेरबंद.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:00+5:302021-04-09T04:11:00+5:30
-- लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने किरकटवाडी फाटा (ता हवेली) येथे एक गावठी ...
--
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने किरकटवाडी फाटा (ता हवेली) येथे एक गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसासह एकास जेरबंद केले आहे. अमर नामदेव शिंदे (वय २७, रा. कासार आंबोली कालभैरवनाथ मंदिरासमोर ता. मुळशी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे मिळून आलेले ३५ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगजीनसह व २०० रूपये किमतीची २ जिवंत काडतूस असा एकूण ३५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पुणे ग्रामीण जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून हवेली पोलीस ठाण्याचे हद्दीत गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून किरकटवाडी फाटा श्रेयस हॉस्पिटल कॉर्नरलगत रस्त्याचे कडेला अमर शिंदे हा उभा असून त्याचे कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल असून ते विक्री करण्यासाठी उभा आहे असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, अमोल शेडगे, मंगेश भगत, जगताप,चन्द्रशेखर, बाळासाहेब खडके, जावळे या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टच्या आत कमरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले.
पुढील तपासासाठी त्याला हवेली पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.