आणखी दीड टीएमसी दौंड, इंदापूरसाठी

By admin | Published: February 4, 2016 01:34 AM2016-02-04T01:34:48+5:302016-02-04T01:34:48+5:30

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या तालुक्यांतील गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात आल्यानंतर मे महिन्यात या गावांसाठी आणखी तेवढेच आवर्तन

For one and a half TMC Daund, Indapur | आणखी दीड टीएमसी दौंड, इंदापूरसाठी

आणखी दीड टीएमसी दौंड, इंदापूरसाठी

Next

पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या तालुक्यांतील गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात आल्यानंतर मे महिन्यात या गावांसाठी आणखी तेवढेच आवर्तन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.
मे महिन्यात देण्यात येणारे हे जादा पाणी वाचविण्यासाठी महापालिकेने या पुढे दर गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून पालिकेस देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने अद्याप या बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात हे पाणी सोडले गेल्यास पुणेकरांना तीन दिवसांनी पाणी देण्याचा वेळ येणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
काय आहे पाटबंधारे विभागाचे गणित ?
पाटबंधारे विभागाकडून मे महिन्यातही या दोन तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडल्यानंतर धरणात शिल्लक राहणारे पाणी पुणे शहरास जुलैअखेरपर्यंत दिवसाआड पाणी दिले, तरच पुरणार आहे.
मे महिन्यासाठी पाणी दिल्यास पाणीकपात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे ही कपात टाळायची असेल, तर या महिन्यापासूनच आठवड्यातून एकदा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पालिकेने बंद ठेवावा, असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून पालिकेसमोर ठेवण्यात आला आहे.

Web Title: For one and a half TMC Daund, Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.