सोनसाखळी चोरीप्रकरणी एकास दीड वर्ष सक्तमजुरी
By admin | Published: July 7, 2017 02:59 AM2017-07-07T02:59:36+5:302017-07-07T02:59:36+5:30
दौंड तालुक्यात रेल्वेमध्ये सोनसाखळी हिसकावल्याच्या खटल्यात बापू ऊर्फ पांड्या ऊर्फ पांडुरंग गोरख भोसले याला येथील जिल्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : दौंड तालुक्यात रेल्वेमध्ये सोनसाखळी हिसकावल्याच्या खटल्यात बापू ऊर्फ पांड्या ऊर्फ पांडुरंग गोरख भोसले याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. बी. शिंदे यांनी दीड वर्ष सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
न्यायालयाने एका वर्षातच हा निकाला दिला. ही घटना दि. २७ मार्च २०१६ रोजी घडली होती. या खटल्याची हकिगत अशी, २७ मार्च २०१६ रोजी मुंबई रेल्वेने लिजिता सुब्रह्मण्यम या प्रवास करीत असताना रात्री आठच्या सुमारास दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील रेल्वे स्थानकावर रेल्वे काही क्षण थांबली होती. त्या वेळी बापू ऊर्फ पांड्या भोसले याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरली. या प्रकरणी लिजिता यांच्या फिर्यादीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नंतर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोसले याला अटक केली.