प्रेमापोटी दीड वर्ष वीजबिल खिशातून

By admin | Published: May 29, 2016 03:42 AM2016-05-29T03:42:07+5:302016-05-29T03:42:07+5:30

आपल्या गावातील शाळा राज्यात आदर्श असल्याचा अभिमान बाळगताना गावातील रघुनाथ शंकर कर्डिले या ग्रामस्थाने कर्डेलवाडी जि. प. शाळेला सर्वोतोपरी मदत करण्याचा ध्यास घेतला.

One and a half years of love bills from electricity bills | प्रेमापोटी दीड वर्ष वीजबिल खिशातून

प्रेमापोटी दीड वर्ष वीजबिल खिशातून

Next

शिरूर : आपल्या गावातील शाळा राज्यात आदर्श असल्याचा अभिमान बाळगताना गावातील रघुनाथ शंकर कर्डिले या ग्रामस्थाने कर्डेलवाडी जि. प. शाळेला सर्वोतोपरी मदत करण्याचा ध्यास घेतला. शाळेच्या प्रेमापोटी कर्डिले कुटुंबीय गेल्या दीड वर्षापासून शाळेचे वीजबिल स्वत: भरत आहेत. शाळेच्या डिजिटल उपक्रमासाठी शाळेला एलसीडीही त्यांनी भेट दिला आहे.
वर्षाचे ३६५ दिवस सुरू असणाऱ्या व गुणवत्तेबाबत राज्यच नव्हे, तर देशपातळीवर चमकलेल्या कर्डेलवाडी शाळेचे कौतुक सर्वांनाच आहे. अशात ज्या गावात शाळा आहे, त्या गावाच्या ग्रामस्थांना कौतुक नसेल तर नवलच. या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सकट व राष्ट्रपती आदर्श पुरस्कार प्राप्त सहशिक्षिका बेबीनंदा सकट यांनी शाळेत व विद्यार्थ्यांत केलेल्या आमूलाग्र बदलामुळे ग्रामस्थ; तसेच पालकवर्ग शाळेला मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. जि. प. शाळांना व्यावसायिक दराने वीजबिल आकारणी केली जात आहे. शासनाकडून वीजबिलासाठी काहीच तरतूद केली जात नाही. कर्डेलवाडी शाळेच्या मदतीमुळे प्रभावित झालेल्या कर्डिले यांनी मात्र या शाळेला या त्रासापासून मुक्त केले. दीड वर्षांपासून कर्डिले हे शाळेचे वीजबिल भरत आहेत. यासाठी त्यांचे आतापर्यंत ६० हजार रुपये खर्च झाले आहेत.

दगडखाण कामगारांचीही मदत
- शासनाकडून जि. प. शाळांना वर्षाला ठराविक रक्कम मिळते. या रकमेतून सर्व खर्च भागवणे शक्य होत नाही.
- अशात सकट यांनी लोकसहभागाला प्राधान्य दिले. यातच सकट दाम्पत्याने वेळोवेळी शाळेसाठी स्वनिधीचा उपयोगही केला.
- आज यामुळे या शाळेत वर्गांमध्ये पंखे, प्रकाशयोजना, संगणक, एलसीडी प्रोजेक्ट, टेलिव्हीजन संच, एलसीडी, लायब्ररी, जलशुद्धीकरण यंत्रणा, स्वत:ची विंधनविहीर, रेफ्रिजरेटर यासह विविध साहित्य उपलब्ध आहे.
- या शाळेत दगडखाण कामगारांची मुले असून, दगडखाण कामगारांनी आपल्या मुलांमधील वाढलेली गुणवत्ता पाहून शाळेला ५५ हजार रुपयांचा एलसीडी भेट दिला आहे.

Web Title: One and a half years of love bills from electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.