महाराष्ट्रात उरलाय केवळ एकच ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:31 PM2018-12-22T18:31:52+5:302018-12-22T18:40:27+5:30

कधी काळी या पक्ष्यांची १३०० संख्या होती. ती आता दीडशेहून कमी झाली असून, महाराष्ट्रातून तो संपल्यातच जमा झाला आहे. 

one and only 'Great Indian Bustard' remains in Maharashtra | महाराष्ट्रात उरलाय केवळ एकच ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ 

महाराष्ट्रात उरलाय केवळ एकच ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ 

Next
ठळक मुद्देकधी काळी होती १३०० संख्या ; आता ९० टक्के संपला महाराष्ट्रात उरलाय केवळ एकच ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ 

श्रीकिशन काळे 
पुणे  : एकेकाळी राष्ट्रीय पक्षी होण्याच्या स्पर्धेत असणारा आणि सर्वात उंच उडणारा म्हणून ओळखला जाणारा ग्रेट इंडियन बस्टर्ड हा पक्षी नामशेष होत असून, त्याच्या संवर्धनासाठी आता पर्यावरणप्रेमींनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पेटिशन दाखल करण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे. त्याद्वारे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नागरिक या पक्ष्याच्या संवर्धनासाठी पाठिंबा देत आहेत.  कधी काळी या पक्ष्यांची १३०० संख्या होती. ती आता दीडशेहून कमी झाली असून, महाराष्ट्रातून तो संपल्यातच जमा झाला आहे. 
 देहराडून येथील सरकारी भारतीय वन्यजीव संस्थेतर्फे (डब्ल्यूआयआय) तर्फे जगातील लुप्त होत जाणारा पक्षी द ग्रेट इंडियन बस्टर्डवर आता उपग्रहाद्वारे नजर ठेवणार आहे. त्यांना त्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 
भारत आणि पाकिस्तानमधील काही भागात हा पक्षी दिसून येतो. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि मध्यप्रदेशमध्ये हा पक्षी आहे. शिकार आणि नैसर्गिक जंगल नष्ट झाल्याने या पक्ष्याचे अस्तित्वच संपून जात आहे. गवताळ भागात हा पक्षी राहतो. परंतु, असे भाग आता कमी होत आहेत. हा पक्षी सर्वात मोठा असून, त्याचे पाय आणि मान लांब असल्याने दुरूनही तो दिसतो. त्यामुळेच त्याच्यावर उपग्रहाद्वारे नजर ठेवता येणार आहे. हा पक्षी गुजरात येथील कच्छ आणि राजस्थानमधील काही भागात दिसून येतो. जगात हा पक्षी सर्वात लांब उडत जाणारा म्हणून ओळखला जातो. 
आंतरराष्ट्रीय पर्यावरण संरक्षण संघातर्फे (आययूसीएन) २०११ मध्ये धोक्यात असणारी पक्ष्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये या पक्ष्याचा समावेश होता. या संस्थेनूसार २००८ मध्ये या पक्ष्याची संख्या ३०० च्या जवळपास होती.  २०११मध्ये हीच संख्या २५० वर आली आणि आता तर ती दोनशेपेक्षाही कमी आहे. या पक्ष्याच्या संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१२ मध्ये आराखडाही तयार केला होता. परंतु, त्याचे पुढे काय झाले, हे माहित नाही. राजस्थान सरकारने १२ कोटी रूपये त्या पक्ष्याच्या संरक्षणासाठी जाहीर केले होते. त्यानंतरही या पक्ष्यांच्या संख्येत वाढ करता आलेली नाही. 

‘बस्टर्ड’ नावामुळे नाही झाला राष्ट्रीय पक्षी
या पक्ष्याचे नाव राष्ट्रीय पक्षी घोषित करावे, यासाठी मोरासोबत होते. तेव्हा पक्षीतज्ज्ञ डॉ. सालिम अली यांनी देखील या पक्ष्याच्या बाजूने कौल दिला होता. परंतु, या पक्ष्याच्या नावात बस्टर्ड हा शब्द असल्याने लोकांमध्ये गैरसमज पसरेल, म्हणून राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यात आला नाही. 
ब्रिटिशांच्या काळात या पक्ष्याची संख्या १३०० च्या आसपास होती. परंतु, आज ही संख्या १५० च्या खाली आली आहेत. एकट्या राजस्थानमध्ये शंभरच्या जवळपास हा पक्षी असून, इतर राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत राहिली आहे. हा पक्षी वाचविण्यासाठी द कार्बेट फांउडेशनने पेटिशन दाखल केले असून, त्याला पाच हजारहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली आहे. 

संख्या कमी होत असल्याची कारणे

  •  समोर पाहण्याची त्यांची दृष्टी कमी होत असून, त्यामुळे विजेच्या तारांना धडकून त्यांचा मृत्यू होण्याचे एक कारण आहे. 
  •  जमिनीवर अंडी देत असल्याने त्यांची अंडी अनेकदा साप व सरपटणारे प्राणी खाऊन टाकतात. 
  •  लांबी एक मीटर व वजन १० ते १५ किलो 
  •  २० ते १०० मीटरपर्यंत वर उडू शकण्याची क्षमता 
     

वन विभागाची आकडेवारी 
२००४ : ११०
२००६ : ९६
२००७ : गणना नाही 
२००८ : ७३
२००९ : ५५ 
२०१० : ८४
२०११ : ६३
२०१२ : ५३
२०१३ : ६०
२०१४ : १०३
२०१५ : १३३
२०१६ : १३८

अनेक राज्यांतून नामशेष 
पूर्वी हा पक्षी पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्टÑ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि तमिळनाडू या राज्यात आढळून येत असे. परंतु, आता काही राज्यांमधून हा नामशेष झाला आहे. 

सध्याची राज्यांमधील संख्या 
राजस्थान : १०० 
गुजरात : २५ 
महाराष्ट्र : १ 
आंध्र प्रदेश : ६ 

प्रतिक्रिया :
देशात ग्रेट इंडियन बस्टर्ड कमी होणे हे सरकार आणि संवर्धनासाठी काम करणाºया संस्थांचे अपयश आहे. एक पक्ष्याची प्रजाती नष्ट होऊ लागली आहे. परंतु, त्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. ग्रेट इंडियन बस्टर्डला गवताळ प्रदेश लागतो. तो प्रदेश कमी होत आहे. खरंतर सरकारने गवताळ प्रदेश हा परिसंस्था म्हणून पाहिला पाहिजे. तो विनावापराची जागा म्हणून पाहू नये. आता हा पक्षी इतका कमी झालाय की परत त्याची संख्या वाढविणे अतिशय अवघड आहे. 
-धर्मराज पाटील, संशोधक, वन्यजीव प्राणी 

Web Title: one and only 'Great Indian Bustard' remains in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.