भोंदूबाबासह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:58 AM2017-08-13T03:58:24+5:302017-08-13T03:58:27+5:30

श्रीगोंदा आणि कर्जत या दोन ठिकाणी शेतक-यांना गुप्तधनाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबासह दोघांवर शुक्रवार (दि. ११) रोजी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

One arrested with Bhondu Baba | भोंदूबाबासह एकाला अटक

भोंदूबाबासह एकाला अटक

Next

दौंड : श्रीगोंदा आणि कर्जत या दोन ठिकाणी शेतक-यांना गुप्तधनाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबासह दोघांवर शुक्रवार (दि. ११) रोजी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी भोंदूमहाराज अब्दुल जावेद अब्दुल समी (वय ४८, रा. जिनसी चौक, जहाँगिराबाद, भोपाळ मध्य प्रदेश), दौंडमधील भोंदूबाबाचे साथीदार भारत धिंडोरे (वय ४२, रेल्वे सफाई कर्मचारी, दौंड), विक्रम पवार (रा. नेहरु चौक, दौंड) या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भोंदूबाबा अब्दुल जावेद अब्दुल समी, त्याचा साथीदार भारत धिंडोरे या दोघांना अटक करण्यात आली त्यांना कर्जत न्यायालयाने शुक्रवार (दि.१८) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सापळा रचल्याने भोंदूबाबा सापडला जाळ्यात
घरात गुप्तधन काढून देतो, म्हणून या भोंदूबाबाने अनेक शेतकºयांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. यातील काही शेतकरी देशोधडीला लागल्याने आर्थिकदृष्ट्या श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतकरी कंगाल झाले आहेत. यातील श्रीगोंदा येथील एका कंगाल शेतकºयाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून भोंदूबाबा अब्दुल जावेद याला पकडण्यास मदत केली. त्यानुसार दौंडचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, कल्याण शिंगाडे, आशिफ शेख, धनंजय गाढवे, सुनील बगाडे, बापू रोटे, दत्तात्रय चांदणे या पोलिसांनी सापळा रचून भोंदूबाबा आणि त्याच्या एका साथीदाराला दौंडमध्ये ताब्यात घेतले.

Web Title: One arrested with Bhondu Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.