सव्वासात लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:50+5:302021-05-22T04:10:50+5:30

पुणे: ट्रेड फंड कंपनीत काम करीत असल्याचे भासवत ट्रेड फंडद्वारे बँकेतून सात कोटी रुपये कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर करून ...

One arrested for embezzling Rs 1 lakh | सव्वासात लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला अटक

सव्वासात लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला अटक

Next

पुणे: ट्रेड फंड कंपनीत काम करीत असल्याचे भासवत ट्रेड फंडद्वारे बँकेतून सात कोटी रुपये कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर करून त्याद्वारे कमिशन मिळून देण्याच्या आमिषाने सव्वासात लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला २५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

राजकुमार वाणी (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तेरा एप्रिल ते १८ मे या कालावधीत ही घटना घडली.

वाणी याने फिर्यादींना सदरच्या कंपनीत ट्रेड फंडद्वारे बँकेतून एकूण ७ कोटी रुपये कंपनीच्या खात्यावर ट्रान्सफर करतो आणि तुम्हाला कमिशन मिळून देतो, असे आमिष फिर्यादींना दाखवले. सदरच्या ट्रेड फंडचा डीडी पास करण्यासाठी व आरटीजीएस करण्यासाठी फी म्हणून वाणी याने एका बँक खात्यावर २ लाख २५ हजार, तर दुसऱ्या बँक खात्यावर पाच लाख रुपये असे एकूण सात लाख पंचवीस हजार रुपये भरण्यास सांगून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी वाणी याला न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील सव्वासात लाख रुपयांपैकी ४ लाख २४ हजार २२६ रुपये हस्तगत करण्यात आले असून उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी, त्याने तो ट्रेड फंड कंपनीत नोकरी करत असल्याचे सांगितले असून, तो कोणत्या कंपनीत काम करतो याबाबत तपास करण्यासाठी, त्याने फिर्यादींना सात कोटींच्या डीडीची बनावट कॉपी पाठवली होती, तो डी.डी. त्याने कोठे तयार केला, त्याचे आणखी कोणी साथीदार आहे का, त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मगाणी सरकारी वकिलांनी केली.

Web Title: One arrested for embezzling Rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.