आदिवासी महिलांच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:09 AM2021-07-22T04:09:12+5:302021-07-22T04:09:12+5:30
किशोर काळे असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबात पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार, ...
किशोर काळे असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबात पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार,
काळे या युवकाने आका संस्थेचे नाव सांगत त्या संस्थेकडून बेरोजगार महिलांना लघुउद्योग उपलब्ध करणार असल्याचा बनाव केला. त्याने बचत गटातील महिलांना संस्थेसंदर्भात माहिती दिली. लघुउद्योगासाठी लागणारा कच्चा माल व साहित्य मोफत देणार असल्याचे सांगूनन संस्थेमार्फत अंगणवाडीसाठी लागणाऱ्या खावटीचा पुरवठा केला जात असल्याचे सांगितले. शिवाय गहू, हरभरा अशा धान्यांची पॅकिंगसाठी पाच रुपये संस्थेकडून महिलांना दिले जातील, असे आमिष किशोर काळे यांनी दाखविले. जनसेवा लघु उद्योग विकास (महाराष्ट्र) या संस्थेचे प्रवेश अर्जापोटी प्रत्येकी तीनशे रुपये गोळा केले होते. लघुउद्योगासाठी लागणारा कच्चा माल आठ दिवसांनी तुम्हाल आणून देतो असे असे सांगतत्याने पोबारा केला, त्यानंतर तो पुन्हा फिरकलाच नाही त्याने कोणाचा फोनही उचलला नाही.
याबाबत महिलांनी तक्रार केल्यावर पोलीस हवालदार मनीषा ताम्हाणे, पोलीस अंमलदार अमोल शिंदे, भरत सुर्यवंशी यांचे पथकाने बीड येथे किशोर काळे यास मोबाईल लोकेशन द्वारे शिताफीने पकडले. आरोपीस जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुवावली.