‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे...’; दारूच्या नशेत धमकी देणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 06:53 AM2023-04-12T06:53:09+5:302023-04-12T06:54:18+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा फोन आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली.

one arrested for threat call to attack on cm eknath shinde | ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे...’; दारूच्या नशेत धमकी देणारा जेरबंद

‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे...’; दारूच्या नशेत धमकी देणारा जेरबंद

googlenewsNext

पुणे :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे, असा धमकीचा फोन आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली. आरोपीने सोमवारी रात्री ११२ या हेल्पलाइनवर फोन करून ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’, असे सांगून फोन बंद केला. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतले. राजेश मारुती आगवणे (४३) असे त्याचे नाव असून, ताे मुंबईतील धारावी परिसरात वास्तव्याला आहे. 

आरोपीने सोमवारी रात्री ११२ वर फोन करून छातीत दुखत असून, रुग्णवाहिका पाठवा, असे कळवले होते. नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा, असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच क्रमांकावर फोन करून मुख्यमंत्री शिंदेंना उडवण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी राजेश आगवणे हा वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. त्याची पत्नी कोथरुडला खासगी ठिकाणी काम करते. 

Web Title: one arrested for threat call to attack on cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.