फसवणूक प्रकरणी एकाला अटक
By admin | Published: October 6, 2016 04:01 AM2016-10-06T04:01:02+5:302016-10-06T04:01:02+5:30
शेअर मार्केट आणि गुळाच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ७ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला हवेली पोलिसांनी अटक केली.
पुणे : शेअर मार्केट आणि गुळाच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ७ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला हवेली पोलिसांनी अटक केली.
गणेश रामचंद्र बाबर (वय ४७, रा़ आपटे कॉलनी हिंगणे खुर्द) असे त्याचे नाव आहे़ याशिवाय, सुनील वसंतराव पाटील (वय २८) आणि प्राजक्ता सुनील पाटील (वय २८, दोघेही रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी प्रफुल्ल रावण सोनकवडे (वय ४४, रा़ नांदेड सिटी, सिंहगड रोड) यांनी हवेली पोलिसांकडे फिर्याद दिली. बाबर याने सोनकवडे यांना एस. व्ही. पाटील इंटरप्रायझेसमध्ये शेअर गुंतविण्याचे व गुळाच्या व्यापारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ७ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली. सोनकवडे पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर पैसे मागण्यास परत आल्यास जिवे मारण्याची धमकी त्यांना दिली.
याप्रकरणी पोलिसांनी बाबर याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी त्याला ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)