बलात्कार प्रकरणी एकाला अटक
By Admin | Published: May 30, 2017 03:07 AM2017-05-30T03:07:46+5:302017-05-30T03:07:46+5:30
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणखी एकाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणखी एकाला वारजे पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी १५ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. प्रतिक बाळासाहेब संपकाळ (वय २३, रा. वारजे माळवाडी) असे कोठडी देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रतिक बरोबर असलेले प्रेमसंबंध घरी सांगण्याची धमकी देत संबंधित पीडितेवर अत्याचार करणाऱ्या एकाला व चेस खेळण्याच्या बहाण्याने त्याच मुलीवर अत्याचार करणाऱ्या २१ वर्षीय तरुणालाही ३० मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रतिक प्रदीप कोटीयान (वय २०, वारजे माळवाडी) असे धमकी देत अत्याचार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे तर अजिंक्य प्रदिप सावंत (वय २१, रा. कोथरुड) असे चेस खेळण्याचा बहाण्याने अत्याचार करणाऱ्याचे नाव आहे. हा सर्व प्रकार १० ते १९ एप्रिल २०१७ दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी घडला. प्रतिक संपकाळ आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती संबंधित मुलीच्या घरच्यांना सांगेल, अशी धमकी देत प्रतिकने तिच्यावर अत्याचार केला. तर १० एप्रिल रोजी अजिंक्यने पीडितेच्या घरी कोणी नसताना चेस खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीवर अत्याचार केले. अधिक तपासासाठी सरकारी वकिलांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.