जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक
By Admin | Published: March 29, 2017 02:46 AM2017-03-29T02:46:12+5:302017-03-29T02:46:12+5:30
कोंढवा येथील इमारतीचे बांधकाम धमकावून बंद पाडले व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर
पुणे : कोंढवा येथील इमारतीचे बांधकाम धमकावून बंद पाडले व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. शाहरुख अन्वर शेख (वय २५, रा. मनीषा अपार्टमेंट, मीठानगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यातील इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना २७ मार्चला दुपारी ए. एस. कन्स्ट्रक्शन या बांधकाम साईटवर घडली. याप्रकरणी आयाज उस्मान शेख (वय ४२, रा. कसबा पेठ, पवळे चौक) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांच्या ए. एस. कन्स्ट्रक्शन या बांधकाम साईटवर सोमवारी चौथ्या मजल्याचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. या वेळी आरोपी व त्याचे दोन साथीदार फारुक व इम्तिहाज तेथे आले. त्यांनी तेथील कामगारांना शिवीगाळ करत बांधकाम बंद पाडले. तसेच बांधकाम जर चालू ठेवायचे असल्यास इतर बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे आम्हाला त्या बांधकामामध्ये एक फ्लॅट व पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे धमकावले. नाही तर जीवे मारण्याची धमकी देत कामगारांना साईटवरून हाकलून लावले.