TikTok व्हिडीओ करणं पडलं भारी, पुण्यात बस चालकाने गमावली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 11:09 AM2020-01-25T11:09:32+5:302020-01-25T11:22:53+5:30

टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एका पीएमपी बस चालकाला महागात पडलं आहे.

one bus driver has been suspended for tiktok video in pune | TikTok व्हिडीओ करणं पडलं भारी, पुण्यात बस चालकाने गमावली नोकरी

TikTok व्हिडीओ करणं पडलं भारी, पुण्यात बस चालकाने गमावली नोकरी

Next
ठळक मुद्देटिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एका पीएमपी बस चालकाला महागात पडलं आहे. टिकटॉकमुळे पुण्यातील बस चालकाला आपली नोकरी गमवावी लागली आहे. बस चालकावर प्रशासनाने  निलंबन आणि चौकशीची कारवाई केली.

पुणे - टिकटॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मोठ्या प्रमाणात युजर्स टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असतात. या व्हिडीओमुळे अनेक जण अल्पावधीत लोकप्रिय झाले आहेत. मात्र टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एका पीएमपी बस चालकाला महागात पडलं आहे. टिकटॉकमुळे पुण्यातील बस चालकाला आपली नोकरी गमवावी लागल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पीएमपीएमएलच्या बस चालकाने टिकटॉकवर एक व्हिडीओ केला होता. कामावर असताना त्याने केलेला हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे. बस डेपोमध्ये त्याने हा व्हिडीओ तयार केला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली. बस चालकावर प्रशासनाने  निलंबन आणि चौकशीची कारवाई केली. त्यानंतर त्याला बडतर्फही केलं आहे. 

@maheshgovardankar

prem kont...hi...asho......

♬ original sound  - suchita vijay😘😘

टिकटॉकवरील व्हिडीओ प्रकरणाची प्रशासनाने  गंभीर दखल घेतली आहे. प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून हे गंभीर आहे. यामुळे महामंडळाची प्रतिमा लोकांमध्ये मलिन होत आहे. या प्रकरणी सर्व चालक-वाहक आणि खासगी बसेस वरील सेवकांना बसमधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल न करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना देखील बसमधील व्हिडीओ करण्यास प्रतिबंध करण्याची सूचना करण्यात आली आहे अशा आशयाचं एक परिपत्रक काढण्यात आले आहे.  तसेच यामध्ये वाहक चालक आणि सेवक यांचे काही व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याचे निदर्शनास आल्यास या सर्वांचे खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. 

@maheshgovardankar

may new e bus opning

♬ dance music - sunmbalkhangee

महत्त्वाच्या बातम्या

तुर्कस्तानमध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप; 18 ठार, 500 जखमी

China Coronavirus : जगभरात अलर्ट! कोरोना व्हायरसमुळे 41 जणांनी गमावला जीव

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष

कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे

 

Web Title: one bus driver has been suspended for tiktok video in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.