हमाल मापाडी महामंडळाचा एकदिवसीय लाक्षणिक बंद; मार्केट यार्डातील व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:52 PM2018-01-30T15:52:42+5:302018-01-30T15:56:42+5:30
माथाडी कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे. याच्याविरोधात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली १ दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला.
पुणे : राज्य सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या माथाडी कामगार कायद्यातील फेरबदलाच्या नावाखाली माथाडी कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे. याच्याविरोधात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली १ दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला.
राज्य सरकार राज्यातील ३६ मंडळ बरखास्त करून एकच समिती तयार करण्याची तयारी चालू असून या समितीचे मुख्य कार्यालय मुंबईला करण्याचा घाट राज्य सरकार करत आहे, त्यामुळे सर्वसामान्य कष्टकऱ्यांना व माथाडी कामगार यामुळे देशोधडीला लागतील असा आरोप श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड कामगार युनियन जनरल सेक्रेटरी संतोष नांगरे यांनी केला.
सोमवारी रात्री पासून हा बंद पुकारण्यात आला, या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पहाटेपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड मध्ये शुकशुकाट होता. सर्व व्यवहार ठप्प झाले होते.