बचत गटातील महिलांच्या हाती एकदिवसीय ग्रामपंचायतचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:45+5:302021-03-10T04:11:45+5:30
विशेष म्हणजे या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गावातील जिजाऊ महिला ग्रामसंघाला ग्रामपंचायतच्या वतीने कार्यालय देण्यात आल्याची घोषणा सरपंच सागर ...
विशेष म्हणजे या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गावातील जिजाऊ महिला ग्रामसंघाला ग्रामपंचायतच्या वतीने कार्यालय देण्यात आल्याची घोषणा सरपंच सागर जाधव यांनी केली.त्या प्रसंगी बोलताना पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन सांगितले की ग्रामपंचायतने हा राबविलेला उपक्रम खुप स्तुत्य आहे.तसेच महिलांनी कोणताही राजकीय मतभेद न बाळगता ग्रामसंघाच्या माध्यमातून आपल्या गावातील सर्व कुटंबांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन आत्मनिर्भर करावे, असे मार्गदर्शन केले. गावात बचत गटाच्या माध्यमातून काम करताना अनेक अडीअडचणी समजतात. गटाच्या प्रमुख महिलांचा गावातील प्रत्येक महिलेशी संपर्क असतो. त्यांच्या समस्या या त्यांना चांगल्या प्रकारे माहित असतात.आणी त्या कशा सोडवायच्या या बद्दल त्यांना उत्तम ज्ञान असते.त्यामुळे बचत गटातील महिलांच्या हाती एकदिवसीय कारभार द्यायचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला.गावातील ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन त्या निवारण केल्या.
सरपंच म्हणुन अरुणा संतोष पंचरास आणि उपसरपंच म्हणुन शिल्पा गणेश ससाणे यांची निवड करण्यात आली. या वेळी दोन्ही एकदिवसीय सरपंच व उपसरपंच यांनी आभार मानताना सांगितले की, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार आहे. घरपट्टी भरणे त्या संदर्भात गावामध्ये जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले,सरपंच सागर जाधव, ग्रामसेवक आर. आर. मोरे, माजी उपसरपंच पुनमताई जाधव, संतोष पंचरास, शालीनीताई जाधव,रंजना विधाटे, सविता जाधव, सविता रोडे, अश्विनी गाढवे, प्रियंका जाधव,अश्विनी जाधव,श्वेता जाधव, निलम जाधव, सरुबाई पंचरास, तबस्सुम इनामदार, गणेश ससाणे, माधव बोऱ्हाडे, अमोल जाधव, आकाश जाधव, छोटु जाधव व बतच गटातील महिला उपस्थित होत्या.