पुणे रेल्वे स्थानकावर चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू; दिवाळी सुट्टीत गाड्या न वाढविल्याचा परिणाम

By विवेक भुसे | Published: October 22, 2022 11:27 PM2022-10-22T23:27:33+5:302022-10-22T23:28:45+5:30

पुणे - दानापूर या बाराही महिने भरून वाहणार्या रेल्वेगाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

One dies in stampede at Pune railway station Consequences of not expanding trains during Diwali holidays | पुणे रेल्वे स्थानकावर चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू; दिवाळी सुट्टीत गाड्या न वाढविल्याचा परिणाम

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू; दिवाळी सुट्टीत गाड्या न वाढविल्याचा परिणाम

googlenewsNext

पुणे :

पुणे - दानापूर या बाराही महिने भरून वाहणार्या रेल्वेगाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या चेंगराचेंगरीत आणखी एक जण गाडीखाली सापडल्याचे सांगण्यात येते
बौधा मांजी ऊर्फ यादव (वय २१) असे मृत्यु पावलेल्या प्रवाशाच्या नावे आहे. याबाबत रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, पुणे -दानापूर ही रेल्वे गाडी पुणे स्थानकावरील प्लॅटफाॅर्म १ वर येत होती. त्यावेळी जनरल डब्यात चढत असताना एका प्रवासी खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला असून त्याला रेल्वे पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पुणे - दानापूर या गाडी १२ ही महिने हाऊसफुल्ल असते. असे असतानाही यंदा दिवाळीच्या काळात मध्य रेल्वेने बिहारकडे जाणार्या गाड्यांमध्ये वाढ केली नाही. दानापूर गाडीला सुरुवातीला व शेवटीची असे प्रत्येकी २ -२ अनारक्षित डबे असतात. या डब्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. गाडी प्लॅटफॉर्मला लागत असताना शेवटच्या २ डब्यांमध्ये चढण्यासाठी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात मांजी हे खाली पडले. त्यांच्या अंगावरुन लोक डब्यात चढत होते. त्यात ते बेशुद्ध पडले. प्लॅटफॉर्म वरील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांना कळविले. त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. नंतर ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित करण्यात आले.

बिहारकडे जाणार्या गाड्यांना नेहमीच प्रचंड गर्दी असते. त्यात दिवाळीत लोक घरी जाण्यासाठी या गाडीसाठी आले होते. गरीब कामगार, कष्टकरी प्रवाशांकडे रेल्वे नेहमीच दुर्लक्ष करुन एसी डबे वाढविले. त्यामुळे गावाकडे जाणार्या कष्टकर्यांचे मोठे हाल झाले. त्यातूनच आज चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाला आपले प्राण गमवावे लागेल.

Web Title: One dies in stampede at Pune railway station Consequences of not expanding trains during Diwali holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे