देशसेवेसाठी कोणी शिक्षण घेत नाही; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची खंत

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: July 8, 2023 03:21 PM2023-07-08T15:21:25+5:302023-07-08T15:21:59+5:30

चंद्रकांत पाटील म्हणाले, आधी नोकरीकडे वळण्याचा कल होता. मात्र, आता प्रत्येकजण व्यवसायाकडे वळत आहे...

One does not study for national service; Higher and Technical Education Minister Chandrakant Patil's regret | देशसेवेसाठी कोणी शिक्षण घेत नाही; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची खंत

देशसेवेसाठी कोणी शिक्षण घेत नाही; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची खंत

googlenewsNext

पिंपरी : आपल्याला उत्तम आयुष्य जगता यावं म्हणून प्रत्येकजण शिक्षणाकडे वळला आहे. मात्र, देशसेवा घडावी म्हणून कोणी शिक्षणाकडे वळत नाही, अशी खंत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. आयसीएआयच्या पिंपरी-चिंचवड शाखेने ग्यानसंवाद या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन निगडीतील ग. दी. माडगुळकर सभागृहात करण्यात आले आहे. त्यावेळी चद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी शाखा अध्यक्ष सचिन बंसल, उपाध्यक्ष पंकज पाटणी, अध्यक्ष वैभव मोदी, खजिनदार शैलेश बोरे, सचिव सारिका चोरडिया, माजी अध्यक्ष विजय बामणे, कार्यकारी सदस्य सचिन ढेरंगे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आधी नोकरीकडे वळण्याचा कल होता. मात्र, आता प्रत्येकजण व्यवसायाकडे वळत आहे. त्यात सीए होणे म्हणजे हे कठीण काम आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा एक भाग म्हणून या विभागाकडे पाहिले जाते. सीए करणे म्हणजे फक्त आयकर रिटर्न्सच्या फाईल्स भरणे नव्हे. आता या कार्याची व्याप्ती वाढली आहे. ज्ञानाची, शिक्षणाची भुक असली की काहीही शिकता येते, असेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: One does not study for national service; Higher and Technical Education Minister Chandrakant Patil's regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.