भारतीय ऑलिंपिकपटूसाठी 'एक स्वप्न, एक लक्ष्य' मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:22+5:302021-09-04T04:15:22+5:30

ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून यश मिळविण्याकरिता या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, सरावासाठी साधनसामग्री, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाची संधी ...

'One Dream, One Goal' campaign for Indian Olympians | भारतीय ऑलिंपिकपटूसाठी 'एक स्वप्न, एक लक्ष्य' मोहीम

भारतीय ऑलिंपिकपटूसाठी 'एक स्वप्न, एक लक्ष्य' मोहीम

Next

ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून यश मिळविण्याकरिता या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, सरावासाठी साधनसामग्री, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाची संधी आणि आवश्यक आर्थिक साहाय्य मिळवून देण्याकरिता या दोन संस्था प्रयत्न करणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ३) महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि ड्रीम स्पोर्ट्सचे पॉलिसी ऑफिसर व ड्रीम स्पोर्ट्स फाउंडेशनचे कार्यकारी प्रमुख किरण विवेकानंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नेमबाजी, मुष्टियुद्ध, कुस्ती, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या क्रीडा प्रकारातील ७ खेळाडूंना २०१४ पॅरिस ऑलिंपिक आणि २०१८ लॉस एंजेलीिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करणार आहेत.

------------------------------

निवड झालेले खेळाडू

(राज्य, खेळाडू, क्रीडा प्रकार व कामगिरी):-

महाराष्ट्र-नुपूर पाटील (19 वर्षे)-नेमबाजी 10मीटर एअर रायफल

महाराष्ट्र-देविका घोरपडे (16 वर्षे)-मुष्टियुद्ध 50 किलो

महाराष्ट्र-तारा शाह(16 वर्षे)-बॅडमिंटन एकेरी

तेलंगणा-श्रीजा अकुला (22 वर्षे)-टेबल टेनिस

तेलंगणा-रिया हब्बू(17वर्षे)-बॅडमिंटन

हरियाणा - नुपूर शेवरान (२२ वर्षे)-मुष्टियुद्ध ७५ किलो गट

हरियाणा - सुनील कुमार (२२ वर्षे)-ग्रीको रोमन कुस्ती- ८७ किलो गट

Web Title: 'One Dream, One Goal' campaign for Indian Olympians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.