एकशे दहा वर्षीय आजीबाईंनी केले कोरोनाला चितपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:47+5:302021-05-01T04:10:47+5:30
-- भिगवण : आयुष्याच्या जीवनपटलावर शतकी खेळी पूर्ण करीत जागतिक महामारीला पराजित करण्याच्या पराक्रम करणाऱ्या लक्ष्मीबाई यांच्यामुळे कोरोना रुग्णांन ...
--
भिगवण : आयुष्याच्या जीवनपटलावर शतकी खेळी पूर्ण करीत जागतिक महामारीला पराजित करण्याच्या पराक्रम करणाऱ्या लक्ष्मीबाई यांच्यामुळे कोरोना रुग्णांन बळ मिळत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता हिमतीने लढावे असा संदेश ११० वर्षीय लक्ष्मीबाई यांनी दिला.
लक्ष्मीबाई पंढरीनाथ देवकर (वय .११० रा, मूळ - रेडा सध्या भिगवण) यांना २१ तारखेला कोरोनाची लक्षण असल्याची जाणीव झाली. यावेळी त्यांनी खचून न जाता भिगवण येथील कोविड सेंटर मध्ये येत कोरोना चाचणी केली.चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. कोरोनामुळे एकीकडे मृत्यूदर वाढला असताना आणि कोरोनात येणार अशक्तपणा यामुळे आता लक्ष्मीबाईंचे कसे होणार याची प्रचंड काळजी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सतावत होती.
नातेवाईकांनी त्यांना तातडीने भिगवण कोविड सेन्टरमध्ये उपचारासाठी दाखल केले. दाखल करतेवेळी त्यांची ऑक्सिजन पातळी ८५ पर्यंत घसरली होती. मात्र याठिकाणी कार्यरत असणारे डॉ. कैलास व्यवहारे आणि डॉ. गणेश पवार यांनी त्यांना ऑक्सिजन लाऊन उपचार सुरु केले. डॉक्टरांचे उपचार आणि लक्ष्मीबाई यांची प्रचंड इच्छाशक्ती यामुळे दोनच दिवसात त्यांची ऑक्सिजन पातळी सुधारली. सात दिवसात उपचार करणाऱ्या डॉक्टर मंडळीना लक्ष्मीबाई स्वताच मला आता बरे वाटत आहे. मला आता घरी जायचं आहे अस सांगितले. आठव्या दिवशी डॉ. व्यवहारे यांनी लक्ष्मीबाई यांचे रक्ताचे रिपोर्ट पाहून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी त्यांना घरी आणले व दहा दिवस विलगीकरणात ठेवले. आजीबाईंना कोविड सेंटर मधून डिस्चार्ज देते वेळी डॉ. कैलास व्यवहारे, डॉ. गणेश पवार, डॉ. अंकिता शिंदे, कोरोना रुग्णांसाठी दिवस रात्र मदत पोहोचविणारे सचिन बोगावत, अमोल वाघ, राहुल धांडे, प्रिया नखाते, रुग्णवाहिका चालक सुहास पालकर उपस्थित होते.
-----