रोटरी कडून आरोग्य केंद्राला शंभर खुर्च्या भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:52+5:302021-04-18T04:10:52+5:30

वारूळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत १२ हजार नागरीकांना लच टोचण्यात आली आहे. सुरूवातीला आरोग्य केंद्रातील पहिल्या मजल्यावरील हाॅलमध्ये ...

One hundred chairs visit to the health center from Rotary | रोटरी कडून आरोग्य केंद्राला शंभर खुर्च्या भेट

रोटरी कडून आरोग्य केंद्राला शंभर खुर्च्या भेट

Next

वारूळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत १२ हजार नागरीकांना लच टोचण्यात आली आहे. सुरूवातीला आरोग्य केंद्रातील पहिल्या मजल्यावरील हाॅलमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. जेष्ठ नागरीकांना पहिल्या मजल्यावर जाणे अशक्य होत असल्याने नागरीकांसाठी आरोग्य केंद्रातील मोकळया जागेत नेटशेड उभारून तसेच १०० खुर्च्या देऊन उपक्रम राबविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ नारायणगाव आणि विदया डेकोरेटर्स यांचे आ. अतुल बेनके यांनी कौतुक केले.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, डॉ. शेताली कामोने, डॉ. अभा त्रिपाटी, युवा नेते अमित बेनके, रोटरीचे अध्यक्ष सचिन घोडेकर, राजेंद्र बोरा, योगेश भिडे, प्रशांत ब्रम्हे, माऊली लोखंडे, हेमंत महाजन , ब्रजेष बंदील , विदया डेकोरेटर्सचे भावेश डोंगरे , आरोग्य सहाय्यक गुंजकर , श्रीमती मुळे आदी उपस्थित होते.

आ. बेनके म्हणाले की , जुन्नर तालुक्यात सर्वाधिक लसीकरण करण्याचा मान वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम सुरू आहे.

--

फोटो क्रमांक : १७रोटरी खुर्च्या

फोटो मजकुर - रोटरी क्लब आॅफ नारायणगाव व विदया डेकोरेटर्स यांच्या संयुक्त विदयमाने वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येणा-या जेष्ठ नागरीकांना बसण्यासाठी नेटशेड उभारून 100 खुर्च्या उपलब्ध करून दिल्या त्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे हस्तांतरण करताना जुन्नरचे आ. अतुल बेनके , रोटरीचे अध्यक्ष सचिन घोडेकर व पदाधिकारी

Web Title: One hundred chairs visit to the health center from Rotary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.