लॉकडाऊनमध्ये ऑनलाईनद्वारे शंभर कोटींचे व्यवहार; औषधांसह अन्नधान्य खरेदीवर जोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 01:35 AM2020-05-23T01:35:33+5:302020-05-23T06:58:57+5:30
कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी देशात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवसाय, उद्योग, बांधकाम क्षेत्र, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली.
- विशाल शिर्के
पुणे : लॉकडाऊनमुळे देशातील सर्व बाजारपेठा ठप्प आहेत. बाजारातील चलनवलन थांबले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या होत्या. या कालावधीत देशभरातील नागरिकांनी आॅनलाईन माध्यमातून जोरदार खरेदी केली आहे. तब्बल ९९ कोटी ९० लाख आॅनलाईन व्यवहारांची नोंद एकट्या एप्रिल २०२० मध्ये करण्यात आली आहे. या माध्यमातून दीड लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) दिली.
कोरोनाचा (कोविड १९) प्रसार रोखण्यासाठी देशात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवसाय, उद्योग, बांधकाम क्षेत्र, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. तब्बल दोन महिन्यांनी कोरोना प्रसाराचा अतिसंवेदनशील भाग वगळून काही अटींवर बाजार सुरू करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र अजूनही प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत.
लॉकडाऊन काळामध्ये अन्नधान्य, भाजीपाला औषध, दूध अशा पदार्थांच्या विक्रीला परवानगी होती. या काळामध्ये बाहेर पडणे शक्य नसल्याने नागरिकांनी इतर वेळी रोखीने केले जाणारे व्यवहारदेखील
आॅनलाईन अॅप अथवा आॅनलाईन बँकिंगद्वारे केले.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून आॅनलाईन व्यवहारामध्ये वाढ झाली आहे. मात्र लॉकडाऊन काळात इतर व्यवहार बंद असतानाही एप्रिल २0१९च्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत तब्बल २१ कोटी ७0 लाखांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर उलाढालही ९ हजार ८0६ कोटी रुपयांहून अधिक वाढली आहे.
या बाबत माहिती देताना नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन आॅफ इंडियाच्या मुख्य कार्यकरी अधिकारी प्रावीणा राय म्हणाल्या, लॉकडाऊन काळामध्ये केबल, फोन, वीज आणि औषध बिल आॅनलाईन भरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर सुपर मार्केट मध्ये अन्नधान्य खरेदीसाठी आॅनलाईन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी या माध्यमाचा वापर वाढला आहे.
या आॅनलाईन व्यवहारांत झाली वाढ
मोबाईल रिचार्ज, टेलिफोन आणि वीजबिल
औषध आणि अन्नधान्य खरेदी
वर्ष व्यवहार संख्या उलाढाल कोटी रु.
(कोटीमध्ये) (कोटी रुपये)
फेब्रु-२० १३.२५ २,२२,५१६.९५
मार्च-२० १२.४६ २,०६,४६२.३१
एप्रिल-२० ९९.९० १,५१,१४०.६६
फेब्रु.-१९ ६७.४० १,०६,७३७.१२
मार्च-१९ ७९.९० १,३३,४६०.७२
एप्रिल-१९ ७८.१० १,४२,०३४.३९