मिरवडी ग्रामपंचायतची शंभर टक्के करवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:06+5:302021-04-02T04:10:06+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे. परंतु बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी थकीत असल्याने ग्रामविकासाला ...
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे. परंतु बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी थकीत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसली आहे. यामध्ये विविध कर वसुलीवरच ग्रामपंचायतीचा विकास अवलंबून आहे. मार्चअखेर असल्यानिमित्ताने सर्वत्र घरपट्टी पाणीपट्टी वसुलीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. सालाबादप्रमाणे विविध अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने घरपट्टी पाणीपट्टी भरणेबाबत उदासीनता दिसून येत आहे. मिरवडी ग्रामपंचायतीकडून संपूर्ण महिनाभर घरपट्टी पाणीपट्टी वसुलीचे सूत्रबद्ध नियोजन करण्यात आले होते.यामध्ये सरपंच सागर शेलार,उपसरपंच शांताराम थोरात तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेविका यांनी घरोघरी जाऊन वसुली करण्यासाठी प्राधान्य दिले होते. ३१ मार्च २०२१ अखेर एकूण घरपट्टी व पाणीपट्टी वसुली दहा लाख साठ हजार तीनशे सत्तावीस रुपये पूर्ण झाली.
ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला असल्यामुळे शंभर टक्के कर वसुली करण्यात यश आले असून जमा झालेला कर तसेच विविध निधीतून ग्रामविकासाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे यावेळी सरपंच सागर शेलार यांनी सांगितले.