आरोग्य विभागातील शंभर टक्के जागा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:14+5:302021-07-24T04:09:14+5:30

--- यवत : पुढील दोन महिन्यांत आरोग्य विभागातील सर्वच्या सर्व १०० टक्के जागा भरणार असून राज्य शासन ...

One hundred percent of the vacancies in the health department will be filled | आरोग्य विभागातील शंभर टक्के जागा भरणार

आरोग्य विभागातील शंभर टक्के जागा भरणार

Next

---

यवत : पुढील दोन महिन्यांत आरोग्य विभागातील सर्वच्या सर्व १०० टक्के जागा भरणार असून राज्य शासन राज्यातील आरोग्य सुविधांच्या बाबत प्राधान्य देत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

यवत येथील श्री गणेश मंगल कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस निमित्त दौंड तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आशा कार्यकर्ती व पत्रकार यांचा कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रमात अध्यक्षस्थानी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. प्रतिभा फाउंडेशनच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार रमेश थोरात , प्रतिभा फाउंडेशनच्या वैशाली नागवडे, जि. प.आरोग्य सभापती प्रमोद काकडे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, जि. प.सदस्य गणेश कदम, वीरधवल जगदाळे, राणी शेळके, पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके, उपसभापती सयाजी ताकवणे, दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य सुशांत दरेकर, नितीन दोरगे, सागर फडके, विकास खळदकर, माजी सभापती मीना धायगुडे, कुंडलिक खुटवड, सदानंद दोरगे, तात्यासाहेब ताम्हाणे, योगिनी दिवेकर आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोना काळात राज्य शासनाने केलेल्या कामांची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांनी आरोग्य विभागासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस आल्यानंतर अनेक लोक याच्या उपचार खर्चामुळे खचले, याचा गांभीर्याने विचार करून सर्व उपचार खर्च राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतला.

आशा कार्यकर्ती व गटप्रवर्तक यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांचे मानधन व इतर प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

कोरोनाची तिसरी लाट कधी येईल याची भीती सर्वांना वाटते मात्र तिसरी लाट कधी आणायची ते आपल्या हातात आहे. सोशल डिस्टट, मास्क, सॅनिटायझर यांचा वापर व महत्वाचे म्हणजे लसीकरण अधिक होणे गरजेचे आहे. ७० ते ७५ % लोकांना लसीकरण झाल्यास समूह प्रतिकारशक्ती येते. यातून साथीला सामोरे जाणे शक्य होणार आहे, असेही शेवटी आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

--

चौकट

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दौंड तालुक्यातील खडकी, राजेगाव व मलठण आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली. तसेच दौंड उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटावरून १०० खटांचे करण्याचा निर्णय झाला आहे. नॅशनल हेल्थ मिशन माध्यमातून सर्व सेवा उपलब्ध करून दिले जाणार आहे. सिटी स्कॅन व डायलिसिस पूर्णपणे मोफत दौंडचे रुग्णालयात होईल यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त खर्चाला सामोरे जावे लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

--

फोटो क्रमांक : २३ यवत कोरोना योध्दा

फोटो ओळ : यवत येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवस निमित्त दौंड तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आशा कार्यकर्ती व पत्रकार यांना कोरोना योद्धा सन्मान देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे आदी

Web Title: One hundred percent of the vacancies in the health department will be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.