पाटस येथे भरधाव लक्झरी बसची वारकऱ्यांना धडक , एक ठार, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 19:21 IST2019-07-01T19:17:41+5:302019-07-01T19:21:20+5:30
पाटस येथील बारामती फाट्याजवळ भरधाव वेगाने धावत येणाऱ्या लक्झरीने (बस क्र. एमएच ०४ जी ७५९९) वारकऱ्यांना धडक दिली.

पाटस येथे भरधाव लक्झरी बसची वारकऱ्यांना धडक , एक ठार, तीन जखमी
पाटस : पाटस येथील बारामती फाट्याजवळ भरधाव वेगाने धावत येणाऱ्या लक्झरीने (बस क्र. एमएच ०४ जी ७५९९) वारकऱ्यांना धडक दिल्याने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक वारकरी ठार, तर तीन वारकरी जखमी झाल्याची माहिती पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे यांनी दिली. हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला.
नागू शिवराम लिंगे (वय ६५, रा. लासुर्णे, ता. इंदापूर) हे वारकरीभक्त या अपघातात जागीच ठार झाले. तर, जनाबाई सीताराम दुधे (वय ५०, रा.भानसगाव, उस्मानाबाद), प्रभावती वैजनाथ सुडके (वय ५५, रा. मोहा, उस्मानाबाद), शालन रमेश वीर (वय ५० रा. मोहा, उस्मानाबाद) हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास वारकरीभक्त रोटी घाटाकडे निघाले होते. दरम्यान, कुरकुंभकडून येणाऱ्या लक्झरी बसने वारकऱ्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला.