ओव्हरलोड ट्रकच्या धडकेत एक ठार

By admin | Published: February 16, 2017 02:59 AM2017-02-16T02:59:31+5:302017-02-16T02:59:31+5:30

नादुरुस्त झालेल्या ओव्हरलोड ट्रकने अचानक उताराने ४०० ते ५०० फूट मागे जाऊन दोन मोटारी, एक टाटाचा छोटा मालवाहू

One killed in the truckload of overloaded truck | ओव्हरलोड ट्रकच्या धडकेत एक ठार

ओव्हरलोड ट्रकच्या धडकेत एक ठार

Next

कुरुळी : नादुरुस्त झालेल्या ओव्हरलोड ट्रकने अचानक उताराने ४०० ते ५०० फूट मागे जाऊन दोन मोटारी, एक टाटाचा छोटा मालवाहू टेम्पो, एक दुचाकी व पानटपरीला धडक दिली. या अपघातात एक जण ठार झाला. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कुरुळी फाटा (ता. खेड) येथे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
अब्दुल ऊर्फ ए. जे. मोमीन (वय ४८, सध्या रा. जय गणेश साम्राज्य, पांजरपोळ भोसरी, मूळ रा. बागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याप्रकरणी सविता मनोजकुमार टंडन (वय ३९, रा. पिंपरी) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंद्रा पी. कुशवाहा (वय २५, रा. धुमनगंज अलाहाबाद, उत्तर प्रदेश) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १४) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी (ता. खेड) जवळील सोनवणेवस्ती येथे अवजड मालाने भरलेला ट्रक (यूपी ७० एटी ५१९९) अचानक रिव्हर्स येऊ लागला.
महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या एका मोटारीला मागे येणाऱ्या या ट्रकने धडक दिली. त्यानंतर एका टाटा कंपनीच्या छोटा मालवाहू टेम्पोला धडक दिली. यानंतर ट्रकने होंडा सिटी मोटारीला (एमएच १४ ईपी ३३८८) धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या दुभाजकाला आदळून वेगात या ट्रकने रस्त्यालगत हवा भरण्यासाठी उभ्या असलेल्या मोटारीला (एमएच १४ सीसी ९५८२) धडक दिली. त्या वेळी या मोटारीचे मालक अब्दुल ऊर्फ ए. जे. मोमीन या ट्रकखाली चिरडले गेले. लगतच असलेल्या श्लोक पान स्टॉलवर हा ट्रक धडकल्यानंतर थांबला.

Web Title: One killed in the truckload of overloaded truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.