भीषण अपघातात अपघातात एक ठार, दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 11:12 PM2017-09-08T23:12:56+5:302017-09-08T23:13:13+5:30
कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे, दि. ८ - कात्रज-मंतरवाडी बायपासवर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातात प्रकाश विलास माने (वय३५) रा. भामेरी, इस्लामपूर यांचा मृत्यू झाला. तर सदाशिव चौटा रा. कल्याण व कंटेनरचालक संतोष डोंगरे हे जखमी झाले आहेत. राजकरण रामलाल कोरी (रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक कात्रज कडून खडी मशीन चौकाकडे जात असताना कोंढवा पोलीस चौकीसमोर तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि त्याने सात वाहनांना उडविले. यात छोटा टेम्पो, सोर्क्पिओ गाडी, कंटेनर, एक मालवाहतूक करणारा टेम्पो व मारुती कार अशा वाहनांना ट्रकने उडविले. यात टेम्पोचालक माने मरण पावला तर गाडीचालक चौटा व कंटेनरचालक संतोष डोंगरे हे जखमी झाले आहेत. जखमींना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघातामुळे कात्रज-मंतरवाडी बायपासवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कोंढवा वाहतूक शाखेचे पोलींस निरीक्षक निंबाळकर व त्यांच्या सहकारी वाहतुक पोलीस यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतुक सुरळीत केली.