नगर- कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 23:25 IST2023-12-17T23:24:57+5:302023-12-17T23:25:08+5:30
रामदास शिसेराव म्हस्के (रा. राजुरी) असे मयताचे नाव

नगर- कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी
आळेफाटा : नगर- कल्याण महामार्गांवर राजुरी शिवारात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे. रामदास शिसेराव म्हस्के रा. राजुरी असे मयताचे नाव आहे.
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजुरी शिवारात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातता रामदास म्हस्के यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघातात कापड व्यावसायिक अक्षय रमेश कणसे आणि निखिल महेश काळे हे गंभीर जखमी झाले आहे. जखमीना आळेफाटा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. आळेफाटा पोलीस अधिक तपास करत आहे.